पळसाच्या पाच पानाच्या देठव्याने शेतकऱ्यांनी केली वृषभराजाची खांदेमळणी

हिमायतनगर(अनिल मादसवार)कृषी प्रधान भारत देशात " बळीराजाचा बैलपोळा " हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येला येथील युवक शेतकर्यांनी जंगल परिसर पिंजून काढून पाच पानाचा देठवा आणून अन्नदात्याची खांदे मळणी केली. आणि बळीराजाला उद्याच्या जेवणाचे निमंत्रण दिले आहे. गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने वाळू लागलेल्या पिकांची चिंता करत पोळ्याचा उत्सव साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे.

नगरपंचायतीने गणेश - दुर्गामूर्ती विसर्जनाची समस्या कायम मार्गी लावावी - दत्तात्रेय वाळके

हिमायतनगर(अनिल मादसवार)गणेश - दुर्गामूर्ती विसर्जनाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पारंपरिक मंदिराच्या विहिरीत विसर्जित केलेल्या मुर्त्या उघड्या पडत असल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यावर कायम तोडगा काढून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नगरपंचायतीने काटेकोरपणे नियोजन करावे अश्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय वाळके यांनी दिल्या. 

ते आगामी पोळा, गौरी - गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर दि.30 मंगळवारी येथील पोलीस स्थानकात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मंचावर महसुलचे

भाजपचे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे - वानखेडे

हिमायतनगर (अनिल मादसवार) हदगाव / हिमायतनगर विधानसभा मतदार संघात होऊ घातलेल्या  निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवन्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील घराघरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती पोंचवावे असे आवाहन माजी खा.सुभाष वानखेडे यांनी केले. ते दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत हदगाव भाजपचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण, माजी पं. स. सभापती प्रमोद मामीडवार, बालाजी जाधव, गोविंदराव कदम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

आगामी काळात होणाऱ्या हदगाव नगर परिषद निवडणूक व हदगाव - हिमायतनगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड(प्रतिनिधी)जिल्ह्यात सोमवार 5 सप्टेंबर ते गुरुवार 15 सप्टेंबर 2016 या कालावधीमध्ये श्री गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस अधीक्षक संजय येनपूरे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,

महापालिकेतील खुशाल कदम तडकाफडकी निलंबीत

नांदेड(खास प्रतिनिधी)नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील नगररचना विभागातील तत्कालिन प्रभारी नगररचनाकार खुशाल कदम यांना आज तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ माजली आहे. 

तत्कालिन आयुक्त सुशिल खोडवेकर यांची बदली झाल्यानंतर त्यांनी या कालावधीत विविध कामांना मंजुरी दिली होती. यात मंजुरी देत असताना संबंधित

तामसा शहरात कुत्र्यांचा हौदोस चार चिमुकल्यांवर हल्ला

तामसा(विक्की मेहेत्रे)शहरात अचानक पाने कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ झाली आहे त्याच बरोबर यातील बरेचसे कुत्रे हे पिसाळलेले असल्याने संपूर्ण तामसा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दारूबंदीचा लढा तीव्र करण्यासाठी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी महिलेची वर्णी

सरसम(साईनाथ धोबे)हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील महिलांनी दारू पुरवठा करणार्यांना पकडून धिंड काढून पोलिसांच्या हवाली केले. परंतु केवळ कार्यवाही करून मोकळे सॊडल्याने सरसम गावातील दारूविक्रीचा धंदा सुरूच होता. या प्रकाराला कंटाळलेल्या सरसम येथील महिलांचा पुढाकारातून ग्रामसभेत एकजूट दाखविली आणि. तीन वर्षानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सिमाबाई गाेखले या महिलेची निवड करून सत्ताधार्यांना जोरदार चपराक दिली आहे.

रस्ते, पाणी समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचे नागराध्यक्षाना साकडे

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी यासह अन्य नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि समस्या सोडवून दिलासा द्यावा अशी मागणी करून येथील महिला - पुरुषांनी नागराध्यक्षाना साकडे घातले आहे.   

निवेदनात म्हंटले आहे कि, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये गेल्या 3 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी नागरिकांना

श्रावण मासात रुद्र पुजेत सर्वानी सहभागी व्हावे - आर्ट ऑफ लिव्हींग

किनवट(प्रतिनिधी)श्रावण मासात रुद्रपुजा करुन सहा शक्ती देवतांना आव्हानाद्वारे दोषमुक्त करण्यासाठी, गावाला सुख सम्रुध्द करण्यासाठी, मानवी जिवनातील दुखः निवारण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रुद्र पुजेत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहण “वसुदैव कुटुंबक” या सुत्रावर काम करणारे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या किनवट शाखेने केले आहे.

गुणवत्ता विकास अभियानांतर्गत वर्गा-वर्गात स्वतंत्र पालकसभा घ्या - अभिमन्यू काळे

नांदेड(प्रतिनिधी)शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत येत्या शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये वर्गा-वर्गात स्वतंत्र पालकसभा घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिल्या आहेत.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जुन 2016 पासून

जिवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील बचतगटांना कर्ज मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)केंद्र शासनाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील बचतगटांना कर्ज मिळणार असून संबंधित बचतगटांनी पंचायत समिती कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन सभापती चंद्र भुक्तरे, गट विकास अधिकारी आर.सी.राऊत यांनी केले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण अभियान कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 18 हजार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम समायोजन करण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी दि.24 ते 31 ऑगस्टपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात सॅन 2005 साली केंद्र सरकारने करून अंमलबजावणीसाठी राज्य,

वैकुंठधामच्या विकासासाठी समितीची निवड..

अध्यक्षपदी श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष पळशीकर, सेक्रेटरीपदी बंडेवार 

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या हिंदू स्मशान भूमी " वैकुंठधाम " च्या विकास कामासाठी नुकतीच समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी शांतीलाल श्रीश्रीमाळ, उपाध्यक्षपदी रमेश पळशीकर तर सेक्रेटरीपदी गोविंद बंडेवार यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्मशान भूमी विकासापासून दूर आहे. येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या हिंदू समाज बांधवाना

जप्तीपोटी आठ मालमत्ताधारकांवर कार्यवाही करताच 20 लाख 66 हजार 490 ची वसुली

नविन नांदेड(रमेश ठाकूर)नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रिय कार्यालय क्र.ड(सिडको) अंतर्गत नियुक्त केलेल्या जप्ती पथकाने मालमत्ताधारकांकडे असलेलया थकबाकी मालमत्ता करापोटी जप्तीची कार्यवाही करण्यासाठी गेले असता आठ जनाविरुध्द कार्यवाही केली असता धनादेशासह एकूण रु.2066490/- वसुली पथकाने केली आहे. 

घर क्र.10-2-339 या मालमत्ताधारकाकडे थकबाकी रु.34105/- होती, दुकान सिल करते वेळेस संबंधतानी

दुकानास आग

मल्टीपर्पज हायस्कुल जवळील एका कपड्याच्या दुकानास आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. छाया - मुनवर खान

इंद्रधनुष्य

श्रावण महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर लोहा तालुक्यातील पेनूर परिसरातील आकाशात  इंद्रधनुष्य दिसून आले. छाया - विनोद महाबळे

बुद्धविहाराची विटंबना

विवेक नगर येथील पद्मपाणी बुद्धविहाराची विटंबना करणारया आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी जल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. छाया - सचिन डोंगळीकर, करणसिंह बैस

जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागातील आत्महत्या प्रकरण;कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)पाणी पुरवठा विभागातील एका लिपिकाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात दोन दिवस ते प्रेत दवाखान्यातच राहिल्यानंतर कार्यकारी अभियंता डाखोरे यांच्याविरुध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी 9.30 ते दहा वाजेच्या दरम्यान पाणीपुरवठा विभागातील  कर्मचारी मारोती वाघमारे यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

1 कोटी 18 लाख 82 हजारांचा अपहार करणाऱ्या कोमवाडला जामीन अर्ज फेटाळला

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)1 कोटी 18 लाख रुपये 82 हजार रुपये हा शासनाचा निधी आपल्या करोडोपती होण्यासाठी वापरणाऱ्या जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम आनंदा कोमवाडने मागितलेली जामीन मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन.सचदेव यांनी फेटाळून लावली आहे.

दि.5 ऑगस्ट रोजी रात्री जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी

खून प्रकरणातील आरोपीने बोलावली पत्रकार परिषद; पोलिसांनी आपले आगमन दाखवताच ठोकली धूम

नांदेड(खास प्रतिनिधी)फेब्रुवारी महिन्यात बाफना टी पॉइंटवर झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी दोन माळी बंधूंना पकडण्यासाठी पोलिसांनी आज लावलेल्या फिल्डींगमध्ये ते अडकले नाहीत. आरोपीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत मोठ्या सन्मानाने उपस्थित राहिलेले पत्रकार मात्र आपल्या नांग्या टाकून परत फिरले. असा हा प्रकार बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडला.

नांदेड शहराच्या बाफना टी पॉइंटवर दि.21 फेब्रुवारी 2016 रोजी सतेंद्रसिंघ संधू नावाच्या 30 वर्षीय युवकाचा खून झाला. त्या खून प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली. याच प्रकरणात

छंद म्हणुन फोटोग्राफि कला जोपासल्यास चांगलं जगण्याची संधी मिळते - बैजू पाटील

नांदेड(अनिल मादसवार)छायाचित्रण कलेच्या माध्यमातुन चमकदार कामगिरी करण्यासाठी वार्इल्ड लार्इफ फोटोग्राफी चांगला पर्याय आहे. निसर्गातील बदल जाणुन घ्यायचे तर जंगल टिपणारी नजर असायला हवी. छंद म्हणुन ही कला जोपासल्यास फोटोग्राफी तुम्हाला निश्चीत चांगलं जगण्याची संधी देते, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार बैजू पाटील (औरंगाबाद) यांनी केले.

स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभार्थ्यांची लूट...जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील काही स्वस्त धान्य दुकानदाराकडून गोर - गरीब लाभार्थ्यांची लूट केली जात असून, शासन दरापेक्षा जादा रक्कम आकारली जात असल्याची ओरड रेशकार्डधारकातून केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन पुरवठा विभाग व लाभार्थ्यांची लूट करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

वसंत साखर कारखान्याच्या गैरकारभाराची साखर आयुक्ता कडून चौकशी सुरू

हदगाव(प्रतिनिधि)वसंत सहकारी साखर कारखान्यात मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभार व अनियमीयतेची चौकशी साखर आयुक्तांच्या आदेश्याने सुरू झाली असून, नकतेच यवतमाळ येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रेणी-१ जी.पी. थोरात यांनी कारखाना स्थलावरील कार्यालयात दोन वेळा चौकशी केली.

राज्यात लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव, लोकमान्य उत्सव राबविण्याचा शासनाचा निर्णय

नांदेड(अनिल मादसवार)लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची 160 वी जयंती वर्ष, त्यांनी सुरु केलेल्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या चळवळीला होत असलेली 125 वर्ष व "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणी तो मी मिळविणारच" या उदगाराचे शताब्दी वर्षानिमीत्ताने यावर्षी राज्यात "लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव" व "लोकमान्य उत्सव" असे विविध कार्यक्रम राबविण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. या स्पर्धांमध्ये गणेशमंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटद्वारे करण्यात आले आहे.

2 कोटी 14 लाखाच्या विविध विकास कामाचा उद्या उदघाटन सोहळा

हिमायतनगर (प्रतिनिधी) नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीच्या विकासाची घौडदोड सुरु झाली असून, उद्या दि.17 बुधवारी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभ हस्ते 2 कोटी 14 लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती युवा नगराध्यक्ष अ. आखिल अ. हमीद यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

हिमायतनगर(अनिल मादसवार)भारत माता कि जयच्या जयघोषाने शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात 70 भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात येथील नायब तहसीलदार गायकवाड, यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी जेष्ठपत्रकार भास्कर दुसे, महावीरचंद श्रीश्रीमाळ, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तत्कालीन तहसीलदार नारायण पैलवाड, गजानन तुप्तेवार, अनंता देवकते, सरदार खान, अभिषेक लुटे, शे.माजिद तरकरीवाले, यांच्यासह सर्वपक्षीय पुढारी, शहरातील मान्यवर नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.

हिमायतनगरच्या नाल्यात आढळला पुरुष जातीचा चिमुकला (अभ्रक)

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहराजवळील विसावाबार नजीक असलेल्या नाल्यात एक 2 महिन्याचे पुरुष जातीचा चिमुकला (अभ्रक) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वैरिणी मातेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केल्या जात आहे. तर याबाबत उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर वे तेलंगणा - विदर्भ राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. दिवसेंदिवस तालुक्याची लोकसंख्या व येथे येणाऱ्यांची संख्या वाढत

श्रीशैलम पातळगंगा ते मालेगाव कावड पदयात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन

नांदेड(प्रतिनिधी)प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मालेगाव जी.वाशीम येथील कावडधारी युवकांची श्रीशैलम  मल्लिकार्जुन पातळगंगा ते मालेगाव कावड पदयात्रा नांदेड जिल्ह्यात दाखल झाली असून, हर हर महादेव... जटाधारी सबसे भारीच्या जयघोषात पुढे मार्गस्त झाली आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणाऱ्या पाताळगंगेच्या किनारी श्रीशैलम महादेवाचे जागृत व हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराची ख्याती दूर - दूरवर पसरली असून, आंध्रप्रदेश राज्यात असलेल्या जटाधारी महादेवाचे श्रावण मासात

जलशिवारच्या निकृष्ट व अर्धवट बंधाऱ्याची चौकशी गुलदस्त्यात

हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे किरमगाव - टेभुर्नी शिवाराला जोडणाऱ्या नाल्यावर दोन महिण्यापुर्वी करण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम गुत्तेदाराने अर्धवट ठेवून पलायन केले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहाने बांध फुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या कंची चौकशी करून नुकसानीची भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, परंतु अद्यापही या बंधाऱ्याची चौकशी तर सोडाच साधी पाहणी न करता चौकशी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गातून तीव्र सांताप व्यक्त होत आहे. तात्काळ चौकशी करावी अन्यथा येथील शेतकरी उपोषणाचे हत्यार उपसण्याचा तयारीत आहेत.

खर्या गरजूना लाभ मिळण्यासाठी दारिद्र्य रेषेचा पुनरसर्वेक्षण करा

हिमायतनगर(प्रतिनिधी)सध्या secc - 2011 च्या यादीनुसार प्रधानमंत्री आवास योजनासाठी ग्रामीण भागातील प्राधान्यक्रम यादी करण्याचे काम सुरु आहे. आगामी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत यादीचे वाचन करून गरजूना लाभ दिला जाणार आहे. परंतु यादीत आलेल्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत असून, यात धनदांडगे व एकाच घरातील अनेकांची नावे समाविष्ठ करण्यात आल्याने खऱ्या गरजूना शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. हा प्रकार होऊ नये म्हणून शासनाने तत्कालीन यादीला बाजूला ठेवून नव्याने पूणरसर्वेक्षण करावे अशी मागणी तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

अंबार्इ धाब्याजवळील मटका व जुगारावर धाड, 25 अटकेत, 71 हजाराचा मुदेमालासह जप्त

मनाठा(विजय वाठोरे)हदगांव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चोरंबा शिवारात अंबार्इ धाब्याजवळ चालणाऱ्या जुगार, मटका आडयावर मनाठा पोलीस स्टेशनचे सपोनी तात्याराव भालेराव यांनी आज सकाळी धाड टाकुन 25 जणांना अटक तर 71 हजाराचा मुदेमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही दिवसापासून मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चोरंबा शिवारात मटका - जुगार आड चालविला जात आहे. 

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी माहूर तहसीलदारांना दिले निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)राज्याच्या सर्व विरोधी राजकीय पक्षाच्या आमदारांनी स्वतःच्या पगारी आणि पेन्शनचा मुद्दा अत्यंत कमालीच्या एकजुटीने सोडविला तसेच राज्य अधिकारी-कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा त्वरित सोडवावा अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनने माहूर तलसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. 

सोशियल मीडियाचा जबाबदारीने वापर करा - पोनी.विठ्ठल चव्हाण

हिमायतनगर (कानबा पोपलवार) वेगाने वाढणाऱ्या सोशियल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या पोस्ट अपलोड करताना प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी बाळगून धार्मिक सौहार्द जपायला हवे. असे मत हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केले.

ते दि.11 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे हिमायतनगर येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. हिमायतनगर शहरातील नागरिक, महिला,विद्यार्थी व पत्रकारांशी त्यांनी आज संवाद साधला. यावेळी वाढत्या छेडछाडीच्या घटना, अवैद्य धंदे व गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी उपस्थितांनी केली.

भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडवण्यासाठी न्यायालयात जिल्हापरिषद अधिकारी-कर्मचारी यांनी दाखवली एकजूट

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)५० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कार्यकारी अभियंता व एका कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी नांदेड जिल्हा परिषदेतील काहीअधिकारी-कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज न्यायालयात एकच गर्दी केली होती. याची चर्चा सबंध शहरात होत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या पाठिशीही कर्मचारी मंडळी आहेत काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.

जिल्हापरिषदेच्या लाचखोर कार्यकारी अभियंता अणि लेखा सहायक २ दिवस पोलिस कोठड़ी

नांदेड (खास प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि लेखा विभागातील सहायक लेखाधिकारी यांनी काल पन्नास हजार लाच स्विकारल्या नंतर आज पहिले जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांनी या दोघांना १३ ऑगस्ट २०१६  पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

लिंबोटीचे पाणी उदगीरला देऊन लोहा-कंधारचे वाळवंट केले- शंकर अण्णा धोंडगे


कंधार (मयुर कांबळे) राज्याच्या सेना - भाजप सरकारने दि.०९/०८/२०१६ लालोहा - कंधार तालुक्यातील एकमेव सिंचनाच्या मध्यम प्रकल्प लिंबोटी धरणाच्या जलाशयातून ६.९७१ द. ल. घ. मी. पाणी उदगीर साठीच्या आरक्षणास मंजूरी देऊन या भागावर मोठा अन्याय केला असून भविष्यात लोहा-कंधारचे वाळवंट होईल असे मत शेतकरी नेते व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केले असून दिनांक १७ अॉगष्ट रोजी लोहा येथे या निर्णयाच्या विरोधात आमदार व राज्य सरकार यांच्या जाहीर निषेध मोर्चाचे आवाहनही केले.

शहिद जवानांना समर्पीत ऐ वतन तेरे लिए 15 रोजी देशभक्ती गीतांचा सोहळा

नांदेड(प्रतिनिधी)देशरक्षणार्थ शहिद जवानांना समर्पीत ऐ वतन तेरे लिए हा देशभक्ती गीतांचा सोहळा दि.15 ऑगस्ट 2016 रोजी सोमवारी सायंकाळी 6 वा. कुसूम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे मुंबईच्या सारेगामा फेम शाकांम्बरी किर्तीकर व हास्यसम्राट राहुल इंगळे यां कलाकाराच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

खालसा हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्यचे वितरण

नांदेड(प्रतिनिधी)गुरूद्वारा सचखंड बोर्ड द्वारा संचलीत खालसा हाईस्कुलच्या सभागृहात खालसा प्राथमिक पाठशाला हिदी, खालसा प्रायमरी स्कुल मराठी माध्यम, दशमेश बालक मंदीर हिंदी व मराठी माध्यम मध्ये शिकत असलेल्या जवळपास 850 विद्यार्थ्याना गणवेश, स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच मार्च 2016 एस.एस.सी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा वाढता कल पाहता दोन नविन दसमेश बालक मंदीर हिंदी व मराठी माध्यमच्या लहान व मोठा गट)उदघाटन करण्यात आला.

मी गरीब का आहे?

या क्रांतिकारी पुस्तकाच्या माध्यमातून “गरीबी” हा विषय लेखक - राज धुदाट यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गरीबीची कारणे त्यांनी समर्पकपणे सांगितली आहेत, त्याचं बरोबर गरीबीमधून बाहेर पडण्यासाठी असलेले पर्याय सुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत / दिलेले आहेत. मी गरीब घराण्यात जन्माला आलो म्हणून मी आयुष्यभर गरीबचं राहावं असे कुठे लिहिले आहे काय? किंवा असा काही नियम आहे काय? प्रत्येकाला आपल्या गरीबीवर नैतिक मार्गाने मात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तर असे म्हणेन आपल्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारी श्रीमंती आमच्या प्रत्येकाला मिळायलाचं हवी आणि किंबहुना तो आमचा जन्मसिध्द अधिकारच आहे. जरी गरीब घरात जन्मास येऊन तो अधिकार आमच्या पासून दूर गेला असेल तरी, अहिंसा व सत्याच्या मार्गाने आम्ही तो अवश्य प्राप्त करू शकतो. आमची गरीबी दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे ऐवढे मात्र खरे. गरीबीवर मात केलेल्यांची अनेक उदाहरणे देता येतील; धीरुभाई अंबानी एकेकाळी पेट्रोल पंपावर किरकोळ स्वरूपाचे काम करीत होते, कारण त्यांचा जन्म एका गरीब परिवारात झाला होता, पण त्यांनी गरीबीशी संघर्ष करून ते देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी एक बनले.

नरेंद्राचार्य महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

हिमायतनगर (प्रतिनिधी) जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संप्रदाय मंडळाच्या वतीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दि.13 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्यवृन्दाकडून विविध सामाजिक, अध्यात्मिक उपक्रम साजरे केले जात असून, त्यांच्या 50 वय जन्मोत्सवा निमित्ताने

पुणे येथील विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी नांदेड येथील ‘जामुंडा’ लघुपट रवाना

नांदेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि आटपाट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र दाभोळकर यांच्या तृतिय स्मृति दिनानिमित्त विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवासाठी नांदेड येथील अक्षरोदय साहित्य मंडळ निर्मित ‘जामुंडा’ हा लघुपट पाठविण्यात आला आहे.

राष्ट्रीय छात्रसैनिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ

नांदेड (प्रतिनिधी) सध्या देशात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेची चळवळ जोरात असून त्यात शासकीय, निमशासकीय संस्थांचा स्वयंस्फूर्त सहभाग वाढला आहे.

राष्ट्रीय छात्रसेना ही देशातील विद्यार्थ्यांची सर्वात मोठी संघटना असून सुमारे 13 लाख छात्रसैनिक एकता, अनुशासन, स्वच्छता आणि धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यांची जोपासना करण्याचे व्रत

स्मशानभूमी व पोलीस कॉलनीला लागूनच फेकला जातोय दुर्गंधीयुक्त कचरा

हिमायतनगर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून शहरातील नाले, रस्ते, यासह घराघरातील केर कचरा नगरपंचायतीच्या वाहनातून चक्क स्मशानभूमी व पोलीस कॉलनीला लागूनच असलेल्या व कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या बाजार ओट्या जवळ फेकला जात आहे. या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्काळ घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहराबाहेर डम्पिंग ग्राउंड उभारून शहरचे विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.

लोह्याचे वाहतूक नियंत्रक राठोड व पत्रकार सचिन पवार यांची सतर्कता


अपहरकर्ता शाळकरी मुलगा आई-वडिलांकडे..!लोहा(हरिहर धुतमल)लातूर येथील शाळकरी मुलगा यशोदिप बाळासाहेब माने हा दुपारी शिकवणी वर्गाला जात असतांना अज्ञातांनी त्याला बेहोश करून अपहरण केले. त्यासलातूर हुन  नांदेड कडे एसटीने आणतांना लोह्यात त्याला होश आला. तो भेरदला होता,.. भीतीने थरथरत होता... बसस्थानकात पत्रकार सचिन पवार यांच्याकडे मोबाईलची मदत मागितली. त्याने वडील-आईंना सगळी हकीकत सांगितली. लोह्याचे वाहतूक नियंत्रक यु.बी. राठोड व सचिन पवार यांनी रात्री साडेअकरा वाजता नातेवाईकांच्या हवाली केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. राठोड व पवार यांच्या सतर्कतेमुळे अपहरण शाळकरी मुलाची आपल्या आईं वडिलांना मिळाला.

डोक्यावरून दारूची पेटी ठेऊन धिंड

सरसम बु. गावामध्ये अवैद्य दारू विक्रीच्या विरोधात महिलांनी एल्गार पुकारला असून, बुधवारी सकाळी दारूचा पुरवठा करणाऱ्या दुचाकीस्वारांना पकडून चोप दिला. आणि डोक्यावरून दारूच्या पेटी ठेऊन  गावातून धिंड काढत पोलिसाच्या स्वाधीन केले. छाया - व्यंकटेश धोबे(नांदेड न्यूज लाईव्ह सेवा)

ऍड. मदन यादव यांचे निधन


नांदेड (प्रतिनिधी) नांदेड वकील संघाचे वकील ऍड.मदन यादव यांचे काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांच्यावर गोवर्धन घाट स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. 
नांदेड जिल्हा वकील संघाचे सदस्य ऍड.मदन यादव हे सुरुवातीच्या काळात वकिलांकडे मुन्शी या पदावर कार्यरत होते. आपल्या अथक प्रयनांनी त्यांनी विधी पदवी प्राप्त केली

... अबब पोलीस निरीक्षकाजवळ १४१.५८ टक्के ज्यादा अपसंपदा

नांदेड(प्रतिनिधी)बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस निरीक्षक उद्धव शिंदे यांनी लाच स्वीकारून आपली प्रतिष्ठा दाखवली होती. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या संपत्तीची उघड चौकशी करून आज त्यांच्या विरुद्ध आपल्या उत्पन्नाशी विसंगत अशी १४१.५८ टक्के संपदा जास्तीची जमवल्या प्रकणी एक नवीन गुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर पत्नीसह दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव शिंदे आपल्या नोकरीवर रुजूझाले होते.

दोन हजारांची लाच घेणारा तलाठी झाला गजाआड

नांदेड (प्रतिनिधी) वडिलांच्या मृत्यू नंतर आईच्या नावावर शेती फेरफार करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या तलाठी अन्नपवाड याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. 
तलाठी सज्जा देवठाणा ता.भोकर येथील तलाठी नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड याने एका शेतकऱ्याला त्यांची जमीन वडिलांच्या मृत्यू नंतर आईच्या नावावर करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

नविन नांदेड (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमीत्य संभाजी ब्रिगेड दक्षीणच्या वतीने हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्‌घाटन दक्षीण नांदेड चे आमदार हेंमत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

खुल्या समरगित स्पर्धेत कामगार कल्याणकेंद्र चौफाळा प्रथम

नविन नांदेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट नांदेडच्या वतीने आयोजीत खुल्या समरगीत स्पर्धा 2016-17 मध्ये कामगार कल्याणकेंद्र चौफाळा प्रथम तर द्वितीय कामगार कल्याण केंद्र वसमत हे आले आहेत. 

या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मंडळ गट नांदेडच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी कामगार कल्याण केंद्र सिडको येथे खुल्या समरगीत स्पर्धेचे

माता भागोंजी पुण्यस्मरण निमित्त भव्य लंगर-प्रसाद संपन्न


नांदेड(रवींद्र मोदी)शीख इतिहासात श्री गुरु गोबिंदसिंघ जी महाराज यांच्या सेनेतील वीर सेनापती म्हणून सुप्रसिध्द महिला माता भागों जी (भागकौर) यांच्या पुण्यस्मरण दिनांनिमित्त मंगळवार, ता. 09 ऑगस्ट रोजी गुरुद्वारा तख्त सचखंड परिसरातील बुंगा माईं भागों जी येथे धार्मिक कार्यक्रमश्रध्देच्या वातावरणात पार पडले. 

नांदेड जिल्ह्यातील रेल्वेस्थानके नांदेड डिव्हजनलाच जोडा --खा. अशोकराव चव्हाण


खा. अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची भेट घेऊन चर्चा केली. नांदेड जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत बातचित केली.

देगलूर ते श्रीशैलम मल्लीकार्जून पदयाञा

मागील दहा वर्षापासून माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम संगमवार यांच्या नेत्तूत्वाखाली देगलूर ते श्रीशैलम मल्लीकार्जून अशी पदयाञा श्वाण महिन्यात काढण्यात येते. ही पदयाञा बुधवारी मार्गस्थ झाली. यामध्ये देगलूर येथून १५० जण सहभागी झाले. महेश पाटील यांनी स्वागत केले.यावेळी विक्रम साबणे,अवधुत भारती, संतोष पाटील, बालाजी मैलागिरे. छाया - किरण मुधोळकर