पोस्ट्स

अंनिसच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिमा
नांदेड (एनएनएल) नांदेड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुधवारी शहरातील महात्मा फुले पुतळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील आयटीआय येथील महात्मा फुले पुतळ्याशेजारी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस व पारसी अंजुमन ट्रस्टचे प्रदीप कांबळे, विद्या केळकर, जगदीश वंजारे, संजय कोकरे, शिवाजी मसुरे आदी कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात लक्ष्मण शिंदे, वसंत कलंबरकर, शिवाजी नाईकवाडे, अमोल कुलकर्णी, बालाजी टिमकीकर, आनंद बिरादार, विजय डोनेकर , धनंजय बुट्टे, शिवराज जाधव, संजय दारलावर, राहुल भालेराव, विठ्ठल चव्हाण, राजू दहिवाळ आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. चंद्रहर्ष टीमकीकर याच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना फळे आणि गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरील शिबिरात अंनिसचे राज्य प्रशिक्षण कार्यवाह इंजि. आनंद बिरादार, जिल्हाध्यक्ष डॉ किरण चिद्रावार,  जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शिंदे , इंजि सम्राट हटकर, इंजि रंजना खटके, प्रा बालाजी कोंपलवार, ऍड. धोंडिबा पवार, बालाजी टीमकीकर, कुलदीप…

नगरपंचायत कर्मचार्‍यांचे मागण्यांसाठी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन

प्रतिमा
हिमायतनगर (एनएनएल) महाराष्ट्र राज्य नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीच्या कर्मचारी कामगारांनी दि.9 आॅगस्ट रोजी शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन केले. 
कार्यरत कर्मचारी कामगार यांना शंभर टक्के वेतन शासनातर्फे द्या, चोविस वर्षे अश्वासीत योजना लागू करा, राज्य कर्मचाऱ्यांसोबत सातवा वेतन आयोग लागू करा, ग्राम पंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांचे नगरपंचायतीमध्ये समावेश करा व निवृत्ती वेतन लागू करा, रोजंदारी /कंञाटी कर्मचाऱ्यांना कायम करणे या सह आदी मागण्यां असून त्या मागण्यांसाठी आंदोलनाची सुरुवात दि. 9 आॅगस्ट रोजी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करून झाली. तसेच दि.10 आॅगस्ट ते 14 आॅगस्ट पर्यंत काळ्या फिती लावून काम करणे, 15 आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानतंर जिल्हास्तर, तालुका स्तरावर पालकमंञी, खासदार, आमदार यांना मागण्यांचे निवेदन देणे, सदरील मागण्यांबाबत विचार नाही झाल्यास, दि 10 आॅगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर झालेल्या एक दिवसीय सामुहिक रज…

वाचनसंस्कृती संवर्धनासाठी शाळा दत्तक योजना स्तुत्य् उपक्रम --जिल्हाधिकारी

प्रतिमा
नांदेड (एनएनएल) मानवी जीवनात वाचनाचे महत्व् अगाध असून जगणे समृध्द व परिपूर्ण करण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही. भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्यासाठी शालेय मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक असुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली  नांदेड जिल्हयातील सार्वजनिक वाचनालयांनी सुरु केलेला शाळा दत्तक योजना हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेड येथे ग्रंथालयशास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन व क्रांतीदिनाचे औचित्यावर शाळा दत्तक योजनेच्या शुभारंभप्रसंगी उदघाटक म्हणून बोलताना मनोगत व्यक्त करीत होते.
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत,सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.आ.गंगाधर पटने, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सुर्यवंशी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती. ग्रंथालयशास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर.रंगनाथन व राष्ट्रपिता महात्मा गांधी…

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल - पो.नि.निकाळजे

प्रतिमा
नविन नांदेड (एनएनएल) ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी व त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल राहिल असे मत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी हडको येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत केले. 
ग्रामीण पोलीस स्टेशन, ईच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हडको व नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे यांच्या संयुक्तरित्या झालेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक हडको येथील शिवाजी उद्यान परिसरात दिनांक 08 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशांत ढोणे, मराठवाडा विभागीय फेस्कॉम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डी.के.पाटील, उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, महिला उपनिरीक्षक स्वाती कवाळे, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी इंगेवाड यांच्यासह ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे व मान्यवर पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती. बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल राहिल असे सांगून…

श्रीक्षेत्र काळेश्वर, विष्णुपुरी येथे महाप्रसादाचा भक्तांनी घेतला लाभ

प्रतिमा
नविन नांदेड (एनएनएल) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी व क्षेत्रिय कार्यालय अ,ब,क,ड च्या वतीने श्रावणमास निमित्त श्रीक्षेत्र काळेश्वर, विष्णुपुरी येथे महाप्रसादाचा भंडाराचा लाभ अनेक भाविकभक्तांनी घेतला. यावेळेस मनपा प्रशासनाचे अधिका-यांसह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती.  
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावणमास निमित्त श्रीक्षेत्र काळेश्वर, विष्णुपुरी येथे दि.09 ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह माजी विरोधी पक्ष नेते जीवन पाटील घोगरे, नगरसेवक बाळासाहेब देशमुख, संजय मोरे, क्षेत्रिय अधिकारी माधवी मारकड, संजय जाधव, अविनाश अटकोरे, सुधिर इंगोले, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्यासह मालमत्ता व्यवस्थापक संधु व मनपा पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी कानोटे, पंडित जाधव, विविध विभागांचे अधिकारी/कर्मचारी यांच्यासह ग्रामीण भागातून आलेल्या हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.   

ज्योती कदम यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार

प्रतिमा
नांदेड (एनएनएल) येथील सुप्रसिध्द कवयित्री व साहित्यिक ज्योती कदम यांना पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी नुकताच जाहीर झाला आहे. पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात 13 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार कदम यांच्यासमवेत डॉ. नरेशचंद्र काठोळे, इशान संगमनेरकर आदि मान्यवरांनाही घोषित झाला आहे.
ज्योती कदम यांचे मोरपीस आणि गारगोट्या, चित्रकाव्य आदि चार पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचन केले असून त्यांची व्याख्यानेही प्रसारीत झाली आहेत. नामवंत व नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकांवरील त्यांचे समीक्षणही अनेक दैनिकांमधून प्रकाशीत आहे. त्यांच्या कवितेचा शालेय अभ्यासक्रमातही समावेश झाला असून विविध वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या दै. श्रमिक एकजूटमधील कवी आणि कविता या सदराचे त्या गेल्या दीड वर्षापासून संयोजन करीत आहेत. यापूर्वी त्यांना दै. लोकमत सखी सन्मा…

राखी पौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाची घेतली शपथ

प्रतिमा
नांदेड (एनएनएल) व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल, धनेगाव ता.जि. नांदेडच्या विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षांची लागवड केली. तसेच झाडाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.
या कार्यक्रमास बालाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. श्रीदेवी पाटील, उपप्राचार्य विशाल इंगळे, सहशिक्षक बालाजी कडबे, वर्षा घुंगराळे, ममता जयस्वाल, अर्चना अलमखाने, स्वाती बिरदे, आरती दुमणे आदी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे उपक्रम राबविण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन याविषयी प्रेम निर्माण व्हावे हा उद्देश असल्याचे यावेळी प्राचार्या श्रीदेवी पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन बालाजी कडबे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य नप कर्मचाऱ्यांचे अंदोलन संपन्न

प्रतिमा
विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आमदारांचे आश्वासन
माहुर (एनएनएल) महाराष्ट्र राज्य नप कर्मचाऱ्यांचे सामुहिक रजा अंदोलन आज दि.09 (बुधवार) रोजी नगर पंचायत कार्यालय माहुर येथे संपन्न झाले.
सातवा वेतन आयोग,सहाय्य अनुदान रद्द करने,नप कर्मचाऱ्यांना आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळावे,रोजनदारी कर्मचाऱ्यांना विना अट कायम करणे,नपचे बळकटिकरण, मुख्याधिकारी यांना उन्नत दर्जा,बदली धोरणातील जाचक अटी,अदीसह तिस ते चाळीस मांगण्या प्रलंबित आहे त्या साठी बुधवार रोजी सामुहिक अंदोलन करण्यात आले.या विषयी आमदार प्रदिप नाईक यांना भ्रमणध्वनीवरून कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्या नंतर त्यांनी या विषयी चालु अधिवेशनात शुन्य प्रहरात प्रश्न उपस्थित करण्याचे अश्वासन दिले.तर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी अदोलना ला पांठिबा देत नगराध्यक्ष संघटना कर्मचाऱ्यां सोबत तण मण धणाने सोबत असल्याचा अभिप्राय दिल.प्रस्ताविकातुन स्थानिक  कर्मचारी संघटनेचे नेते शेषेराव भिसे यांनी गेल्या अनेक वर्षा पासुन नप अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मागण्यांना वाटण्याचा अक्षदा लावण्यात येत आहे.त्या मुळे अंदलोनाची दिशा ठरविण्यात आली असुन दि.10 ते 14 आगष्ट  पर्…

अस्‍वच्‍छतेच्‍या लढाईतून स्‍वच्‍छतेचे राज्‍य निर्माण करु - जिल्‍हाधिकारी डोंगरे

प्रतिमा
कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड (अनिल मादसवार) गावस्‍तरावरील घाणीच्‍या विळख्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी आता सर्वांनी पेटून उठले पाहिजे. तसेच ही लढाई जिंकून आपणां सर्वांना स्‍वच्‍छतेचे राज्‍य निर्माण करावयाचे आहे असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्‍ट्र जिवनोन्‍नती अभियान व स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बुधवार दिनांक 9 ऑगस्‍ट रोजी खुले में शौच से आझादी व संकल्‍प स्‍वच्‍छतेचा स्‍वच्‍छ महाराष्‍ट्राचा या विशेष अभियानासाठी जिल्‍हयातील सर्व स्‍वंयसहाय्यता महिलांची जिल्‍हास्‍तरीय एक दिवशीय कार्यशाळा घेण्‍यात आली त्‍यावेळी उद्घाटक म्‍हणून ते बोलत होते.
कै. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहात झालेल्‍या कार्यक्रमात जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक तथा प्रभारी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, युनिसेफचे राज्‍य समन्‍वयक जयंत देशपांडे, आदर्श ग्राम पाटोदाचे भास्‍कर पेरे पाटील, संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता समितीचे माजी …

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जल शुद्धीकरण सयंत्राचे उदघाटन

प्रतिमा
कंधार (मयुर कांबळे) तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त उल्हास मेमोरियल ट्रस्ट संचालित सद्गुरू आदिवासी आश्रम शाळा येथे जल शुद्धीकरण संयंत्राचे उदघाटन जि.प सदस्या सौ.संध्याताई धोंडगे व माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजाचे सुधारक बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय कुरुडे, शालेय समिती अध्यक्षा,माजी जि.प.सादस्या संजीवनीताई कुरुडे, संस्थेचे सचिव शिवाजीराव परळकर आदींची उपस्थिती होती.यावेळी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की आजचा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात क्रांती दिन म्हणून पळाला जातो त्याच दिनाचे औचित्य साधुन आम्ही कंधार, देगलूर व अन्य ठिकाणी आदिवासी भागातील लोकांना शिक्षण मिळण्यासाठी शाळा उभारल्या आहेत आमचा या मागचा उद्देश हाच की जेणेकरून प्रत्येक आदिवासी विद्यार्थी शिकला पाहिजे व समाजाला पूढे नेऊन शिक्षण दिले पाहिजे त्याच बरोबर असप्रष्य लोकांना शिक्षण मिळावे हा…

डमी परीक्षार्थी प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 9 दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिमा
नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) बहुचर्चित बनावट परिक्षार्थी घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने काल सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक केली. त्यास आज किनवट न्यायालयाने 9 दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. या सहायक पोलीस निरीक्षकाने अनेक विद्यार्थ्यांसाठी बनावट विद्यार्थी बणून त्यांच्या परीक्षा दिल्या त्यात अनेक विद्यार्थी पास झाले आहेत.. चौकशीत अनेक खळबळजनक गोष्टी समोर येतील, अशी माहिती सीआयडीचे पोलीस अधिक्षक शंकर केंगार यांनी दिली.
डमी परीक्षार्थी प्रकरणात दि.21 मे रोजी मांडवी जिल्हा परिषद गटाचे सदस्य मधुकर बाबाराव राठोड यांचा मुलगा प्रबोध राठोड यास राज्य गुप्तचर विभागाने मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याच्या जबानीनुसार दुसरा आरोपी म्हणून दि.29 मे रोजी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर याला राज्य गुप्तचर विभागाच्या पथकाने जालन्यात अटक केली. या प्रकरणाचे जाळे संपूर्ण राज्यात पसरलेले असल्याने तपास गतीमान करून यातील दोषी आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू होते. या मोहिमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, काटोल, नागपूर ग…

आपल्या वहिनीवर बलात्कार करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी

प्रतिमा
नांदेड (एनएनएल) एका फळ विक्रेत्याने आपल्या वहिणीवर बलात्कार केल्यानंतर सहाव्या प्रथमवर्ग न्याय - दंडाधिकारी पी. एम. एन. देशमुख यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एक फळविक्रेता विमानतळ रस्त्यावर आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. काल 8 ऑगस्ट रोजी तो आपली फळाची गाडी घेवून फळ विक्री करण्यासाठी गेला तेंव्हा त्याच्या मावशीचा मुलगा फेरोज खाजामियॉ पठाण (26) रा. सिडको हा त्यांच्या घरी आला.फेरोज पठाण सुद्धा फळ विक्रेता आहे. त्यावेळी फेरोज [पठाणची वहिणी (28) ही आणि एक लहान बालक घरी होते. दोन मुले शाळेला केली होती. आपला दीर आला म्हणून त्यास जेवण करण्यास वहिणीने सांगितले. पण दीर जेवण करण्यासाठी आला नव्हता तर तो आपल्या वहिणीकडे शरीर सुखाची मागणी करु लागला. तिने सांगितले की माझा नवरा आहे, लेकरे आहेत अशी मागणी बरोबर नाही. पण फेरोज पठाणने वहिणीचे काहीच न ऐकता तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आणि निघून गेला. 
आपल्यावर झालेला अत्याचार आणि त्यामुळे होणारी बदनामी या भितीने त्या 28 वर्षीय विवाहित महिलेने भरपूर रॉकेल पिवून घेतले आणि त्यानंतर तब्येत खराब झाले. तिला नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारार्थ…