पोलीस स्थानकात जातीय सलोखा हॉलीबॉल सामने

हिमायतनगर(प्रतिनिधी) येथील पोलीस स्थानकात बुधवारी जातीय सलोखा हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात नगरपंचायतीचे नगरसेवक, पत्रकार, शांतता कमिटीचे सदस्य व युवकांनी सहभाग घेतला होता.

हिमायनगर शहर हे गेल्या अनेक वर्षपासून हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतीक
असल्याचे अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमातून दिसून आले आहे. हि एकता व बंधुभाव अधिक वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्या सूचनेनुसार दि.02 बुधवारी येथील नगरसेवक, पत्रकार, शांतता कमिटीचे सदस्य व व्यापारी मंडळाच्या हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक - पत्रकार व शांत कमिटीचे सदस्य यांच्यात सामना पार पडला. या सामन्याचे उदघाटन पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाअध्यक्ष अनिल मादसवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यावेळी पत्रकार वर्सेस नगरसेवक असा सामना खेळण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेला सामना नगरसेवक संघाने जिंकला या सामन्यातून सर्व समाजाच्या खेळाडूंनी सहभाग घेतल्याने हिंदू - मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले. यावेळी डॉक्टर माने, शंकर पाटील, अनिल पाटील, जावेद भाई, अश्रफ भाई, फेरोज खान, अन्वर खान, कुणाल राठोड, आहद भाई, खय्यूम भाई, राम सूर्यवंशी, सदाशिव सातव, पत्रकार गोविंद गोडसेलवार, कानबा पोपलवार, साईनाथ धोबे, संजय मुनेश्वर, ज्ञानेश्वर पंदलवाड, धम्मा मुनेश्वर, सोपान बोम्पीलवार, जांबुवंत मिराशे मिराशे, गजानन चायल, दिलीप शिंदे, परमेश्वर शिंदे, गोविंद शिंदे यांच्यासह अनेक पत्रकार, शांतात कमिटीचे सदस्य, नगरसेवक, नागरिक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पंच म्हणून पोलीस जमादार डांगरे यांनी काम पाहिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी