विजवितरण अधिकाऱ्यांच्या हिटलरशाही कारभारामुळे शेतकरी त्रस्त

हिमायतनगर (अनिल मादसवार) महावितरण कंपनीच्या हिटलरशाही कारभाराला आता अक्षरशा शेतकरी वैतागले असून, ऐन रब्बीचा हंगाम दिवाळी सणासुदीत खंडित वीज पुरवठ्याने कापशीसह रब्बी पिकांसाठी पाणी देणे अवघड बनले आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 12 तास सुरळीत वीजपुरवठा केला नाही तर शेतकरी कोणत्याही क्षणी महावितरण कनिष्ठ, उपकार्यकारी अभियंता तथा 33 के.व्ही.केंद्रावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यांनी खाजगीत बोलताना सांगितले आहे.

गेलात तीन वर्षांपासून नापिकीने हैराण झालेला शेतकरी यंदा परतीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीत आला आहे. सोयाबीन, ज्वारी, उडीद, मुगाची नुकसानीत आणल्याने चिंताग्रस्त बनला आहे. उर्वरित कपाशीची पिके सुद्धा लाळ्या व पिवळ्या रोगाने नुकसानीच्या गर्तेत कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्यांनी कापसाला पाणी देऊन रब्बी हंगामाची आशा धरून गहू, हरभरा, करडी, सुर्यफुल या पिकांचा पेरा करण्याची तयारी केली आहे. परंतु यावरही महावितरण कंपनीच्या अधिकारी, काही लाईनमन कर्मचार्यांच्या मनमानी तथा दुर्लक्षित कारभारामुळे अडचणीत सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांचा स्टार उंचाविण्यासाठी 12 तास वीजपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच वीज बिल वसुलीतेही सवलत देणार असलयाचे सांगितले आहे, मात्र येथील नव्याने पदावर आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हम करेसो कायदा या म्हणी प्रमाणे कारभार चालू केला आहे. विष पुरवठा वारंवार खंडित होत असून, दरम्यान झालेल्या बिघाडाची दुरुस्ती करण्यासह टाळाटाळ केली जात आहे. परिणामी पिकांना पाणी देण्यासठी मोटार सुरु करताच विदूत्त पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होत असून, परिणामी रब्बीची पिके हातची जाण्याची भीती शेतकर्यांना लागली आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या हिटलरशाही कारभारामुळे महावितरण कंपनीच्या नावाने बोटे मोडत आहेत. असाच प्रकार महावितरण कंपनीच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी चालू ठेवला तर कार्यालयावर हल्लाबोल करून अभियंत्यांना घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

एवढेच नव्हे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांकडून नियमबाह्य वीज पंपाना वीज पुरवठा करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेत असल्यानेच अनधिकृत वीजपंप चालविले जात आहेत, तर नियामानुसरा बिल भरनार्यांचा विद्दुत पुरवठा जाणीवपूर्वक खंडित करून महावितरण कर्मचार्यांकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. तसेच आर्थिक देवना घेवाण करणार्यांना कर्मचारी परवानगी पेक्षा  अधिक एच.पी.च्या मोटारी चालविण्याची मुभा देत असल्याने अतिरिक्त भार पडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत सल्याचा आरोपही शेतकर्यांनी केला. आणि हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात महावितरण अधिकारी - कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या कारभाराकडे लातूर बोर्डाचे प्रमुख, नांदेड जिल्ह्याचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी, विद्यमान आमदार महोदयांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यात होणाऱ्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी परिसरातील शेकडो शेतकरी, वीज ग्राहकातून केली जात आहे.  
  
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
-------------------------
निवडनुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी बेंबीच्या देठापासून ओरडणारे लोकप्रतिनिधी मात्र आता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असून, महावितरणच्या अधिकार्यांना शेतकऱ्यांची वीज खंडित  न करण्याबाबत कडक सूचना देण्याची गरज असल्याच्या भावना अनेक शेतकर्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी