नांदेड जिल्ह्यातील रेल्वेस्थानके नांदेड डिव्हजनलाच जोडा --खा. अशोकराव चव्हाण


खा. अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची भेट घेऊन चर्चा केली. नांदेड जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत बातचित केली.
शिवनगाव, धर्माबाद, उमरी आणि करखेली हे चार रेल्वेस्थानके सध्या हैद्राबाद डिव्हीजनला जोडलेली आहेत. रेल्वे मंत्रालयाने काही गावे व स्थानके विभाजीत केली असल्याने प्रशासकीय कामात व प्रवाशांना सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील काही स्थानके नांदेड डिव्हीजनमध्ये आहेत तर काही स्थानके हैद्राबाद डिव्हीजनशी जोडली गेली आहेत. कामातील आणि सुविधेतील सुसूत्रता कायम असावी यासाठी एकाच जिल्ह्यातील सर्व स्थानके नांदेड डिव्हीजनला जोडावीत अशी आग्रही मागणी त्यांनी आज केली.

रेल्वे अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आलेली नांदेड लातूर मनमाडपुणे ही रेल्वे 1 जुलै 2016 पासून धावेल असे आश्वासन दिले होते. परंतु डब्बे उपलब्ध नसतांनाही ही रेल्वे जाहीर केली गेली त्यामुळे नांदेडलातूरमनमाडपुणे ही रेल्वे त्वरीत सुरु करावी अशीही मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. यासोबतच धर्माबाद आणि उमरी रेल्वेस्थानकावर काही एक्स्प्रेस रेल्वे थांबत नाहीत त्यामुळे या गाड्यांना धर्माबाद, उमरी येथे थांबा द्यावा असेही ते म्हणाले. दरम्यान मराठवाड्यातील पीआयबीचे कार्यालय बंद करु नयेत अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी लोकसभेत केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी