वीज उपकेंद्राच्या कामात निकृष्ठ साहित्य

पाच कोटीच्या वीज उपकेंद्राच्या कामात निकृष्ठ
साहित्याचा मुक्तवापर
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील वडगाव ज. आणि पळसपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वीज वितरण उपकेंद्राचे काम संथ गतीने केले जात आहे. अंदाजपत्रकाला बगल देऊन झालेल्या या कामात निकृष्ठ साहित्याचा मुक्तपणे वापर करण्यात आल्याने कामाची गुंनीयंत्रक पथकाद्वारे चौकशी करूनच कामाचा शुभारंभ करावा अशी मागणी परिसरातील विकास प्रेमी नागरीकातून केली जात आहे.

याबाबत सविस्तर असे कि, हिमायतनगर तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने पळसपूर आणि वडगाव ज. येथे नव्याने सब स्टेशन उभारणीसाठी मंजुरी मिळाली होती. यासाठी शासनाकडून एका विद्दुत उपकेंद्राच्या निर्मित्तीसाठी २.५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून, गुत्तेदार व अभियंत्याच्या हितासाठी अंदाजपत्रकाचा आकडा फुगविण्यात आला असल्याचे कामाच्या दर्जावरून दिसून येत आहे. सदरचे काम हे नांदेड येथील कंठेवाड नामक ठेकेदाराकडून करण्यात येत असून, यात अत्यंत निकृष्ठ कंपनीचे सिमेंट, माती मिश्रित रेती आणि विहिरीच्या दगडाचा मुक्तपणे वापर करून गुत्तेदार अभियंत्याचे हित जोपासण्यात आले आहे. 

सदरचे काम करताना गुत्तेदाराने पाणी टंचाईच्या काळात सुरु केल्यामुळे या कामाची गुणवत्ता घसरली असून, पाणी नसल्याने म्हणावी तशी क्युरिंग झाली नसल्याने पोल उभारणीसह अन्य  कामाला तडे जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अल्पावधीतच संबंधित ठिकाणी कामाची अंदाजपत्रकीय किंमत, कामाची सुरुवात व अंतिम मुद्दत, ठेकेदारचे नाव असलेले फलक लावणे बंधनकारक आहे. परंतु असा कोणताही फलक न लावता विद्दुत उपकेंद्राचे काम करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात विशेषतः हिमायतनगर - हदगाव तालुक्यातील वीज बिल देयके, नवीन खांब डीपीची उभारणी, दुरुस्ती यासह महावितरण कंपनीची अन्य कामे पोसलेल्या एकाच गुत्तेदाराच्या हवाली केलि जात असल्याने अभियंता व गुत्तेदार यांची मिलीभगत असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे पळसपूर, वडगाव ज.येथील वीज पुरवठा उपकेंद्राची करण्यात येत असलेली कामे हि दर्जाहीन होत आहते. यावर्षी उभे केलेलं विद्दुत पोल सहा महिन्यात वाकत असून, अनेक ठिकाणच्या विद्दूर तारा जमिनीला झुकत असल्याने पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हिमायतनगर तालुक्यात करण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणच्या उपकेंद्राच्या कामाची चौकशी करुनच देयके आदा करण्यात यावीत अशी मागणी जाणकार नागरीकातून करण्यात येत आहे. 

गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर अंधारात
-----------------------------
गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे अनेक विद्दुत पोल अक्षरश्या आडवे झाले असून, विद्दुत तर जमिनीला टेकल्या आहेत. यामुळे महावितरण कंपनीचे शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहक तीन दिवसापासून अंधारात आहेत. दुरुस्तीची कामे करणारी ठेकेदाराकडून कामे उरकण्यात हगार्जीपणा दाखविल्या जात असल्याने शहरासतील नागरिकांचा महावितरणच्या नावाने बोटे मोडण्याची वेळ आली आहे. मध्ये भोकर येथून विद्दुत पुरवठा घेऊन शहराची समस्या दूर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मिळालेल्या विजेचा दाब कमी अधिक होऊ लागल्याने परमेश्वर गल्ली, रुख्मिणीनगर सह शहरातील अनेक भागातील वीज ग्राहकांची अनेक विद्दुत उपकरणे खाक होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. याची चौकशी करून संबंधिताना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली जात आहे. सदरचे वृत्त लिहीपर्यंत शहराचा विद्दुत पुरवठा पूर्णतः सुरळीत करण्यात महावितरण कंपनीला अपयश आल्याने नागरीकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

वीज पुरवठा सुरळीत करण्यास महावितरण अपयशी 
-----------------
एकीकडे शहरातील रुखामिनी नगर, परमेश्वर गल्ली, सह अन्य भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरण सपशेल अपयशी ठरली आहे. तर दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट रात्रंदिवस २४ तास चालू आहे. त्यामुळे हजारो युनिट विजेची गळती होत असून, यास जबाबदार कोण असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वीज बिलाची देयके भरण्यास विलंब झाल्यास थेट विद्दुत पुरवठा खंडित केल्या जातो. वीज बिल भरूनही गेल्या तीन दिवसापासून नैसर्गिक आपत्तीने शहर अंधारात असताना तातडीने सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा करणे महावितरणची जबाबदारी नव्हे काय..? असा सवाल ग्राहक विचारीत आहेत. 

याबाबत उपकार्यकारी अभियंता पंडित राठोड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणले कि, आमचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत आहेत. आज सायंकाळ पर्यंत वाकलेल्या पोलच्या जागी नवीन पोल उभारून विद्दुत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तेंव्हा नागरिकांनी सुद्धा आमची अडचण लक्षत घेऊन सहकार्य करावे असे आव्हानही त्यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी