शिक्षकांसाठी उपोषणाचा इशारा

शिक्षकांची रिक्त पदे भर अन्यथा उपोषण करणार - काळे


हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील जी.प.केंद्रीय कन्या शाळेत रिक्त असलेले शिक्षकांची पदे त्वरित भरवते अन्यथा शाळेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर काळे यांनी दिला आहे. 

कन्या शाळा येथे वर्ग पहिली ते सातवी मराठी मध्यम व वर्ग पहिले ते चौथी पर्यंत उर्दू माध्यमाची शाळा भरविली जाते. मराठी माध्यमासाठी व उर्दी माध्यमाची एकूण विद्यार्थी संख्या जवळपास ६५५ आहे. यात मराठी माध्यमाच्या शिक्षकांची ५ पदे रिक्त असून, उर्दू विभागाचा कारभार मात्र एकाच शिक्षकावर असल्याने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षांची रुची कमी होत असून, विद्यार्थ्यांचा कल खाजगी शैक्षणिक संस्थांकडे वाढत आहे. अपुर्या शिक्षक अभावी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता अभियान म्हणजे केवळ पोकळ बांबू ठरत आहे. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे तत्काळ भरवित अन्यथा पालक समवेत शाळेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर काळे यांनी गटशिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

याबाबत गटशिक्षण अधिकारी संगपवाड यांच्याशी संपर्क साधला असता या शाळेवर पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त असून, उर्वरित प्राथमिक शिक्षकाची सर्व पदे भरली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी