महंत भारती 15 जून पर्यंत नांदेडात

माहूर चे महंत श्री मधुसूदनजी भारती यांचे 15 जून पर्यंत नांदेडात वास्तव्य 

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) माहूर गडाचे मालक महंत श्री मधुसूदनजी भारती हे दशहरा समाप्ती साठी नांदेडला आलेले आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी ते दररोज सकाळ संध्याकाळ मार्केट कमिटीच्या मैदानात स्थानापन्न होतात.त्यांच्या मुक्काम 15 जून पर्यंत तेथे आहे. 15 जूनच्या दुपारनंतर ते माहूर गडाकडे रवाना होणार आहेत. दरबारा वर्षांनी हा प्रवास महंतजी करतात तो सुद्धा मेणा सवारीने पूर्ण होतो. 

दर बारा वर्षांनी माहूर गड दत्त शिखरचे महंतजी नांदेडला येत असतात.नांदेडच्या गोदावरी तीरावर दशहरा समाप्ती चा कार्यक्रम निश्चित असतो.सिंहस्थ पर्वणी काळातील हा कार्यक्रम सर्व जनांना महत्वपूर्ण मानला जातो.मेणा सवारीने त्यांचा हा प्रवास सुरु होतो.भोकर तालुक्यापर्यंत आणि नंतर बासर आणि पुन्हा नांदेड जिल्हा असा प्रवास सुरु होतो.आणि जेष्ठ शुक्ल पक्ष षष्ठी या दिवशी ते नांदेडला पोहचतात आणि चार दिवस येथेच थांबतात आणि शुक्ल पक्ष दशमी या दिवशी गोदावरी तीरावर अभ्यंग स्नान पार पडते आणि तेथे पूजा अर्चा करून महंतजी पुन्हा माहूर गडाकडे रवाना होतात.महंत श्री मधुसूदनजी भारती यांचा हा दर एक तपा नंतर होणारा प्रवास मोठा धडा देणारा आहे.महंतजी कधीच कोणत्याही वाहनात प्रवास करीत नाहीत त्यांच्या साठी मेणा तयार असतो त्या मेण्याला भोई समाजाचे सहाजण आपल्या खांद्यावर घेतात आणि पायात काहीच वाहणा न घालता चालतात.एकूण १६ भोई बंधू हा मेणा नांदेड पर्यंत आणतात आणि पुन्हा परत नेतात.या भोई बंधूचे प्रमुख आज नारायण हे आहेत.त्यांच्या सांगण्यानुसार त्यांची हि महंत श्री मधुसूदनजी भारती यांच्या सोबत चौथी पर्वणी फेरी आहे.आणि एक फेरी त्यांनी महंत श्री अच्युतानंदजी भारती यांच्या सोबत केली आहे.सध्याचे महंत श्री मधुसूदनजी भारती हे माहूर गडाच्या दत्त शिखरचे बारावे महंत आहेत.जेव्हा महंतजी यात्रा सुरु होते तेव्हा दररोज १२ ते १४ किलोमीटरचा पायी प्रवास केला जातो.सार्वजनिक ठिकाणी महंतजी थांबतात तेथील मारोती मंदिरात आसपासच्या गावकऱ्याना भेटतात.त्यांच्या सोबत जवळपास सव्वाशे माणसांचा ताफा असतो. रस्त्यात महाराज कोणालाच भेटत नाहीत आणि त्यांच्या मेण्याचे दार सुद्धा उघडे ठेवले जात नाही.असा असतो तो एक तपानंतरचा नांदेड प्रवास. 

या सिंहस्थ पर्वणीसाठी महाराजांचे आगमन काल दिनांक ११ जून २०१६ रोजी नांदेडला झाले आहे.नवामोंढा भागातील मार्केट कमिटीच्या पाठीमागे एका मंडपात सर्वसामान्य जनतेला दर्शन देतात.सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी पुन्हा त्यांचे स्थान तेथेच राहणार आहे. 15 जून रोजी नांदेडच्या गोदावरी काठावर महंतजी अभ्यंग स्नान करतात आणि नंतर पूजा अर्चा होते. त्यानंतर दुपारी ते पुन्हा माहूर गडाकडे रवाना होतात अशी माहिती महंतजी सोबत चौथी सिंहस्थ पर्वणी साठी नांदेड वारी करणारे संगेवार यांनी दिली. 

सिंहस्थ पर्वणी निमित्त उद्या कोटीतिर्थ येथे शाहीस्नान

सिंहस्थ पर्वणी निमित्त नांदेड तालुक्यातील कोटीतिर्थ येथील शिवआनंद आश्रम गोदाकाठ येथे उद्या दि. 14 रोजी शाहीस्नान होणार आहे. दत्तशिखर माहूरगडचे श्री परिव्राजकाचार्य  श्रीश्री 108 महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शाहीस्थान पारपडणार आहे.

दत्तशिखर माहूरगडचे श्री परिव्राजकाचार्य  श्रीश्री 108 महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या आगमनानिमित्त कोटीतिर्थ येथील प्राचिन शिवआनंद आश्रमात गोदावरी सिंहस्थ मेळावा, श्री भागवत कथा ज्ञानयज्ञ, गंगादशहरा आणि शाहीस्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शाहीस्नान पारपडणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह माजीमंत्री आ.डी.पी.सावंत, संतबाबा बलविंदरसिंघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गुरुवर्य माऊली बापू ममदापूरकर, सामाजिक कार्यकर्ते बबन वाघमारे आणि कोटीतिर्थ येथील ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी