वगाराची शिकार...

बिबट्याने केली म्हशीच्या वगाराची शिकार...
हिमायतनगर शिवारातील घटना

हिमायतनगर(प्रतिनिधी)पळसपूर रस्त्यावरील हिमायतनगर शिवारात आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एका भुकेल्या बिबट्याने आखाड्यावरील म्हशीच्या वगाराची शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे नदी काठावरील व यावर अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाई ची भीषण समस्या उद्भवली आहे. हिमायतनगर शहराच्या दक्षिण भागाकडून तेलंगणा आणि उत्तर भागाकडून विदर्भ आहे. त्याच्या आजूबाजूला जंगलाचा परिसर असून, यावर्षी अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे मानवा बरोबर वन्य प्रण्यानाही तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशीच तहान भागविण्यासाठी पळसपूर - हिमायतनगर शिवारात भटकणाऱ्या एका बिबट्या वाघाने दि.१२ मंगळवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नागोराव विश्वनाथ वानखेडे हे शेतातून दुध घेऊन गावाकडे गेले होते. दरम्यान शेत सर्व क्रमांक २६/७ मधील आखाड्यावर बांधून असलेल्या म्हशीच्या गोर्ह्यावर बिबट्याने झडप टाकून शिकार केली. सकाळी १० वाजता जेवण करून शेतात येताच वगारू मृत अवस्थेत आढळून आल्याने घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनपाल शिंदे यांनी घटनास्थळी येउन पंचनामा केला. तर पशुधन विकास अधिकारी धनंजय मादळे यांनी शाविछेदन केले. या घटनेत शेतकर्याचे नुकसान झाले असून, शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन वनपाल श्री शिंदे यांनी दिले आहे. 

मागील दोन महिन्यात पळसपूर - वारंगटाकळी परिसरात बिबट्याने दोन गाईंचा फडश्या पडला तर एक महिला व एका पुरुषावर रानडूकरणे हल्ला करून जखमी केले होते.  तेंव्हापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून, यामुळे सर्व सामान्य शेतकरी, मजूर दार जगलीसाठी शेतीवर व दिवस एकटे जाण्यास धजावत नाहीत. हा प्रकार लक्षात घेता वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी जंगल परिसरात पाणवठे तयार करून नागरिक व पशुधानाना सुरक्षा द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

रानडुकराच्या हल्यात शेळी जखमी 

तालुक्यातील विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वारंगटाकळी नदी काठावर मानाग्लावारी सकाळी ८ वाजता खंडीभर शेळ्या घेवून भारत कोंडाबा कांबळे हे गेले होते. दरम्यान पाण्याच्या शोधत आलेल्या रानडुकराने शेळीच्या कळपावर हल्ला चढविला. प्रसंगवधानाने शेळ्या चारविनार्या शेतकर्याने आरडा - ओरड करून नागरिकांच्या मदतीने रानडुक्करास धुडकावून लावाले. परंतु रानडुक्कराणे एका शेळीस चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पशुधन विकास अधिकारी यांनी शस्त्रक्रिया करून उपचार केले.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी