बिबट्याच्या हल्यात गाय ठार..

बिबट्याच्या हल्यात गाय ठार.. हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा.शिवारातील घटना

हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे खडकी बा. ते पावनमारी - टेंभूर्णी बोर्दर्वरून वाहणाऱ्या नाल्याच्या काठावरील एका आखाड्यावर बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत सविस्तर व्रत असे कि, अल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यामानामुळे उन्हाळ्यापुर्वीच पानगळी होऊन जंगले ओस पडली आहेत. तसेच जंगल परिसरातील पाणवठे कोरडे पडल्याने जंगली प्राणी नीळ, हरण, रोही, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, मानवी वस्त्याकडे आगेकूच करीत आहेत. गेल्या महिन्यात तालुक्यात दोन ठिकाणी बिबट्याने हल्ला करून गाई फस्त केल्या, तर वाहनचा धडकेने हरिणाचा मृत्यू झाला. या घटना विसरण्यापुर्वीच दि.०२ जानेवारी रोज खडकी बा.शिवारातील शेतकरी साहेबराव दगडू शेट्टे यांच्या शेत सर्वे नंबर १० मधील गोठ्यात बैल व बाहेर गाय बांधून शेतमजूर घराकडे आला होता. दरम्यान रात्रीच्या वेळेत परिसरात आलेल्या बिबट्या वाघाने गाईवर झडप टाकून नरडी फोडली. तसेच तिचा फडश्या पाडून ठार केले, या घटनेत शेतकर्याची ३० हजाराची दगवून नुकसान झाले आहे. दुसर्या दिवशी घटनेची माहिती शेतकर्याने वनअधिकार्याना दिली. परंतु सुट्टीमुळे ते आले नसल्याने दि.०५ रोजी सरसम बु. परिक्षेत्राचे वनपाल अरविंद गोखले यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन पशु वैद्यकीय अधिकारी मेहेंदळे यांनी केले. परिसरात बिबट्याचा वावर सुरु असल्याचे समजल्या नंतर शेतकरी, नागरिकत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबीकडे वनविभागाने लक्ष देवून जनागल परिसरातील आटलेल्या पाणवठ्यात पाण्याची सोय करून वन्य प्राण्यांची तहान भागवावी. आणि जंगलच्या आसपासच्या गावकर्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी