शेतकऱ्यांची गैरसोय

हिमायतनगर(वार्ताहर)सतत बंद राहणाऱ्या व कोणत्या न कोणत्या कारणास्तव चर्चेत येणाऱ्या हिमायतनगर येथील पशु वैद्यकीय अधिकारी बुधवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी सुद्धा दवाखाना बंद करून ठेवत असल्याने उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या पशूनां तासंतास विव्हळावे लागल्याचे पाहून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

हिमायतनगर तालुक्यात आणि परिसरात ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीने आधीच शेतकरी हवालदिल झाला असून, हजारो रुपये किमतीचे पशुधन सांभाळायचे कसे असा यक्ष प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्या चिंतेने ग्रासलेले शेतकऱ्यांची जनावरे आता विविध आजाराने त्रस्त होत आहेत. आजारांनी त्रस्त झालेले पशुधनाना वाडी तांड्यावरून पाई प्रवास करत हिमायतनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले असतांना नेहमीप्रमाणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालईन वेळेत सुद्धा दवाखाना बंद करून बाहेर जात आहेत. मागील वर्षभरापासून या रुगणालयात मनमानी कारभार चालविला जात असून, या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आपली मर्जीनुसार कार्यालयात ये-जा करत असल्याने वारंवार रुग्णालय बंद रहात असा असल्याचा अनुभव अनेक शेतकरी, पशुप्रेमींना आला आहे. या बाबत अनेक वर्तमान पत्रातून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्याने हिमायतनगर येथे राहत असल्याचे दाखविण्यासाठी नावाला रूम घेवून पूर्वी प्रमाणेच भोकर - हिमायतनगर असा अपडाऊनचा प्रकार सुरुच ठेवला आहे. जबाबदार डॉक्टरच्या या कारभारामुळे अनेक शेतकर्यांना व वन्य प्राण्यांना हाताचे गमावल्याच्या घटना घडल्याचे सर्वश्रुत आहे. अश्या बेजबाबदार अधिकार्याच्या या ठिकाणाहून उचलबांगडी करून कर्तव्य दक्ष अधिकार्याची येथे नियुक्ती करावी. तसेच कामात हलगर्जीपणा व स्थानिकला न राहता ये - जा करत असल्याने यांची माहूर, किनवट भागात बदली करावी अशी मागणी सामान्य नागरीकातून केली जात आहे.

शासकीय योजनांची माहिती शेतकर्यांना मिळेना
---------------------------
येथील पशुधन विकास अधिकारी श्री बिरादार यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकर्यांना शासनच्या योजनापासून वंचित राहावे लागत असून, पाणी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात चार्याची समस्या सोडविण्यासाठी असलेल्या योजनेची माहिती न देत परस्पर मर्जीतील लोकांची शिफारस केल्याचा आरोप शेतकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीसमोर व्यक्त केला आहे. तसेच आजवर तीन वेळा प्रस्ताव भरून दिले परंतु ते वापस आल्याचे सांगून शासकीय योजनाचा फायदा शेतकर्याना मिळवून देण्यात कुचराई करत आहेत.

याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी बिरादार विचारण केली असता उपस्थिती बाबत न बोलता प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाने परत पाठविल्याचे सांगून फोन बंद केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी