धाडसी चोरी

श्वान व ठसे तज्ञ दाखल 
नागरिकात भीतीचे वातावरण 
रात्र गस्त वाढविण्याची मागणी 
गत वर्षीच्या मोठ्या चोरीचा तपास जैसे थे... 

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील तीन ठिकाणावर एकाच दिवशी चोरट्यांनी डल्ला मारून लाखो रुपये नगदी व सोन्या चांदीचा माल लंपास केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने घटनेची दखल घेत पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून तपास सुरु केला आहे. 

याबात सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रुख्मिणीनगर येथील रहिवाशी विजय राहुलवाड हे घराला कुलूप भोकर येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभाला गेले होते. याचा संधीचा फायद घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि लोखंडी आलमारीतील नगदी ८० हजार व कानातील, बोटातील अंगठ्या, हातातील दांकडे आदी सोने चांदीचे दागिने ३५ हजार असे मिळून लाखोचा माल लंपास केला आहे. तसेच या चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला, परंतु अडथळे निर्माण झाल्याने केवळ चपला चोरून पसार झाले. त्यानंतर यांनी शहरातील जनता कॉलनी परिसरातील होणपारखे सर यांच्या घरी सुद्धा चोरी करून १० ते २० हजारचे सोने - चांदीचे दागिने लंपास केले. हे शिक्षक सुद्धा काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गावी गेले होते. तसेच हुजापा शाळेजवळील एका किरण दुकानाच्या सतार काढून खाद्य साहित्यासह चिल्लर रक्कम पळविली आहे. यानानातर सदर चोरट्यांनी कालीन्का मंदिर भागात चोरीचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असताना आवाज येताच धूम ठोकली असल्याचे नागरिक सांगत आहेत. शनिवारच्या मध्यरात्री घडलेल्या या तीन घटनामुळे शहरातील नागरिकत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

घटनेची माहिती सकाळी रुख्मिणीनगर भागातील एका शिक्षकाची चप्पल दिसत नसल्याने विचारणा करताना बाजूच्या घरातही चोरी झाल्याचे लक्षात आले. पाहिले असता घरातील कपाट उघडे सामान अस्ताव्यस्त केले. तसेच चोरट्यांनी स्वयंपाक घरातील साहित्य सुद्धा उचकून पाहिल्याचे दिसून आले. हि माहिती पोलिसांना समजताच तातडीने घटनास्थळावर दाखल होऊन पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी वरिष्ठांना माहिती देत श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. 

कैंडीच्या मते अज्ञान वाहनाने चोरटे पसार 
----------------------------------------------- 
चोरीच्या घटनेनंतर दाखल झालेल्या श्वान पथकाच्या कैंडी श्वानाने सुरुवातील चोरट्यांनी या ठिकाणी सोडलेल्या चपलाचा वास घेवून तपास केला. चोरी झालेल्या घरातून बाहेर गल्ली बोलातून फिरत, हुजापा शाळेजवळील किरण दुकान व त्यामागून स्मशान भूमी रस्ता धरत चौपाटी, मार्गे मातंग वाडा, नालंदा बुद्ध विहार ते जनता कॉलनी तील शिक्षकाच्या घरापासून पुन्हा जुन्या जिनिंग फैक्टरी पर्यंत जावून थांबला. या ठिकाणावरून चोरते अज्ञात वाहनाने पसार झाल्याचे दाखवून दिले आहे. यावेळी श्वान पथकाचे पोलिस निरीक्षक कार सर, हैन्डलकार आयुब खान, वाहन चालक गणनी व स्थानिक पोलिस कर्मचारी सोबत होते. 

ठसे तज्ञांनी घेतली माहिती 
------------------------ 
घटनेची माहितीवरून नांदे येथून इनवेस्टीगेशन टीमचे प्रमुख पोलिस निरीक्षक रहेमान सी शेख, वसमतकर, फोटोग्राफर टाक, वैज्ञानिक सहाय्यक गोडबोले आदींनी दाखल होऊन चोरी झालेल्या घरातील आलमारी व अन्य साहित्याची पाहणी करून टीपण व छायाचित्र घेतले. 

गत वर्षीच्या मोठ्या चोरीचा तपास जैसे थे... 
--------------------------------------- 
गत वर्षी २२ मार्च रोजी शहरातील भुसार व्यापारी व्यंकटेश बंडेवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १० लाखाचे सोने व नगदी रक्कम लंपास केली होती. त्या वेळी सुद्धा श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते, तो तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे यांच्याकडे होता. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शहरातील पोलिस स्थानकाच्या हाकेचा अंतरावरील एका घरात चोरी झाली होती. त्यात जवळपास ४ हजाराची नगदी रक्कम व १.५ लाखाचेसोने चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले होते. त्यावेळी पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली होती. 

लवकरच चोरीचा शोध लावू 
--------------------------------- 
घटनेबाबत पोलिस निरीक्षक अशोक गिरी म्हणाले कि, चोरट्यांचा मग काढण्यासाठी संशयित व सराईत गुन्हेगारान ताब्यात घेवून चौकशी करण्यात येणार आहे, यासाठी दोन पथके रवाना करण्यात आले असून, लवकरच चोरीचा शोध लावून नागरिकांना सुरक्षा देवू असे आश्वासन त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी