मेळाव्यास प्रारंभ..

ध्वजरोहनने स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्यास प्रारंभ..


हिमायतनगर(अनिल मादसवार)४२ व्या स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्यास बुधवारी सुरुवात झाली असून, सायंकाळ पर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक स्काऊट गाईडचे विद्यार्थी परमेश्वरनगरी मध्ये दाखल झाले असून, उद्या गुरुवारी उद्घाटनापर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यातील २५०० ते ३००० विद्यार्थी दाखल होतील अशी माहिती मेळावा उपप्रमुख एन.एम.तीप्पलवाड यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे. 

विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासून स्ववालाम्बानाचे धडे मिळावेत स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावे या उद्दात हेतूने हिमायतनगर येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर केंद्रीय निवासी विद्यालय व परिसरात स्काऊट गाईड, कब बुल बुल या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे नांदेड भारत स्काऊट गाईड व जिल्हा शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी २.३० वाजता संचालन व ध्वज रोहनने मेळाव्यास सुरुवात झाली असून, सायंकाळ पर्यंत रेल्वे, जीप, टेम्पो, ट्रक, बस, ऑटो यासह अन्य वाहनाने जवळपास २ हजाराहून अधिक स्काऊट गाईड व गाईडर दाखल झाले आहेत. शहरात दाखल होणार्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी बैनर लावण्यात आले असून, शहर परिसरात गात १६ वर्षानंतर जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दाखल होणार्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी, तंबू उभारणी, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. रात्री मेळावा आयोजन समिती व पदाधिकारी स्काऊटर, गाईडर सब कैम्प प्रमुखाची सभा व शेकोटी कार्यक्रम संपन्न झाला. रात्रीला १० नंतर रात्र गस्त दिवे बंद पहारा सुरु करून ग्राम सुरक्षेचे धडे विद्यार्थ्यांनी घेतले आहे. दि.१० बुधवार ते १३ शनिवार पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात शालेय कार्याक्रमची रेलचेल चालणार असून, रामधून, वैक्तिक स्वच्छता, व्यायाम - योगा, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध गुणदर्शन, कमवा आणि शिका, स्वतः स्वावलंबी बना, शोभा यात्रा, सराव, विविध देखावे, वेळेचे बंधन, शेकोटी आदीसह स्वयंशासन याला वाव मिळणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील जवळपास ५० हून अधिक शाळांचे कैम्प दाखल झाले असून, यात स्काऊट -७८४, गाईड -३६६, स्काऊटर - १०७, गाईडर - ५० हून अधिक प्रमाणात दाखल झाले आहेत. यासाठी जिल्हा संघटक श्री दिगंबर करंडे, जिल्हा आयुक्त जी.जी.जाधव, कोषाध्यक्ष बी.आर.काचावार, माजी कोषाध्यक्ष डी.व्ही.देशमुख, विश्वनाथ बडूरे, मेळावा प्रमुख श्री बेळगे, गाईड संघटक सौ.रुपाली गुंडाळे, आयुक्त सौ.एम.एस.बच्चेवार, श्री जलदावार, भुसलवाड, कैलास कापवार, सैप्रसाद, उदय हंबर्डे, मोरे, सोनटक्के आदी आहेत. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी हिमायतनगर सह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे प्रमुख शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी परीश्रम घेत आहेत.    

स्काऊट गाईड मेळाव्याचे आज उद्घाटन 
------------------------------------
स्काऊट गाईड, कब बुल बुल जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प.अध्यक्ष मंगलाताई गुंडले, तर प्रमुख अतिथी म्हणून जी.प.उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण सभापती संजय बेळगे, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर, स्काऊट गाईडचे राज्य आयुक्त डॉ.वसंत काळे, प.स.सभापती आदेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, जी.प.सदस्य सुभाष राठोड, शे.रेहाना बेगम, गोपिकाबाई माजळकर, आदींसह अनेक मान्यवर, पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी