धुक्याच्या साम्राज्य

अंबा, तूर, संत्रा, मोसंबीच्या बागांना धोका
कामकाजाला सुद्धा उशिराने सुरुवात

नांदेड(अनिल मादसवार)कालपासून सुरु असलेल्या गारठा व सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पदाचार्यासह शेतकरी नागरिक हैराण झाले. तर दि.१४ रोजी सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांना पिकाची चिंता लागली आहे. 

एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. नुकतेच हिमाचल प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने त्याचा तडाखा आता महाराष्ट्राला बसला आहे.त्यामुळेच कि काय..? आता कालपासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह बहुतांश तालुका परिसर गारठ्याने गारठला आहे. दिवसभर थंडीमुळे आबाल वृद्ध घरातून बाहेर पडण्यास धजावत नाहीत. दि.१४ रोजी आजवरच्या काळात कधीच नी एवढे धुके पडले असून, अक्षरश्या १०० फुट दूरवरील व्यक्ती अथवा परिसर दिसत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. सकाळी ४ वाजता बाहेर पडणारे नागरिक चक्क ६ नंतर बाहेर पडले तरी वाहन चालविताना धीम्या गतीने व लाईट लावून चालविण्याची वेळ आली होती. पादचारी तर विचार करून पावुले टाकत रस्ता पार करीत होते, शेतकरी सुद्धा नेहमीपेक्षा सकाळी ६.३० वाजता बैलगाड्या घेवून बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून सकाळच्या प्रहरी ६.१० वाजता जाणारी रेल्वे हि आज धुक्यामुळे उशिरा दाखल होऊन ६.३५ला येथून रवाना झाली. ती सुद्धा शहरात दाखल होताना ५ कि.मी. व पुढे मार्गक्रमण करताना ५ कि..मी.पर्यंत शिट्टी वाजवत गेल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. सकाळी ६ वाजता डोक्यावर येणारा सुर्य आज माथ्यावर आला असतान देखील धुक्याच्या वातावरणामुळे दडून बसल्याचे दिसून आले आहे. असेच वातावर दिवसभर राहिले तर या धुक्यातून व्हायरल इन्फेक्षण होऊन अनेकांना विविध आजाराला बळी पडावे लागणार आहे. तर बहरात आलेल्या तुर, सुर्यफुल, आंब्याचे फुल धुक्यामुळे करपून जावून तुरीचे नुकसान होणार असल्याने शेतकरी धुक्याने चिंताग्रस्त झाला आहे. आजच्या या परिस्थिमुळे तथा रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने सर्वत्र कामकाजाला सुद्धा उशिराने सुरुवात झाले आहे. दिवसभराचे नियोजन कोलमडले होते. हवामान खात्याचा अंदाज
------------------------
देशाच्या उत्तर भागात थंड हवेची लाट आल्याने, दक्षिण भारत मात्र अवकाळी पावसाच्या छायेखाली आला आहे. दोन-तीन दिवसांत विदर्भ वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून उत्तर गुजरातपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मध्य-महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी, कोकण-गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणा-या बाष्पयुक्त ढगांमुळे राज्यात ही अवस्था निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. फुलो-यात आलेल्या रब्बी पिकांसाठी आणि प्रामुख्याने आंबा व द्राक्ष, संत्रा, मोसंबी, तूर आदी पिकासाठी पाऊस, ढगाळ व धुक्याचे हवामान त्रासदायक होणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवीत आहेत.

किमान तापमान

मुुंबई - २३.८, रत्नागिरी - २१.१, नगर १७.२, जळगाव - १७.६, महाबळेश्वर १६.६, मालेगाव - १९, नाशिक - १७, सोलापूर २०.७, उस्मानाबाद - १७.७, औरंगाबाद - १८, परभणी - १९.२, नांदेड - १७, बीड - १९.८, अकोला - १७.९, अमरावती - १६.२, नागपूर - १४.२.





Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी