साथीच्या आजार वाढण्याची शक्यता

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील मुख्य रस्त्यावर सफाईचे कामगाराकडून काढण्यात आलेली घाण दोन ते तीन दिवस रस्त्यावर राहत असल्याने शहरवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, यामुळे साठीचे आजार जडण्याची शक्यता बळावली आहे. बर्याचदा रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनामुळे अनेकांचे पाय घाणीत पडून घसरून पडावे लागत असल्याने ग्रामपंचायतीच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत सामान्य नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे संबंधितानी लक्ष देवून सदरची घाण तत्काळ उचलून बाहेर नेवून फेकावी अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या वातावरणातील बदल व व्हायरल इन्फेक्शन व वाढत्या घाणीमुळे सर्वत्र साथीचे आजार पसरत असून, याचा फटका गोर - गरीब व सामान्यांना सहन करावा लागत आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील बाजारपेठेत मोठी असल्याने नेहमी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची कोर्ट, कचेरी, तहसील व बैन्किंग व इतर कामासाठी बाजारकरुंची वर्दळ सुरु असते. मात्र या सर्वाना होणार्या अडचणी दूर करण्यात व ग्रामसुविधा देण्यास स्थानिक ग्राम पंचायतीचे पुढारी व अधिकारी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शहरवासियांना स्ट्रीट लाईट, खड्डेमय रस्ते, नाल्याची सफाई, मोकाट जनावरांचा सूळसूळाट, शहरातील मुख्य रस्त्ये व गल्ली बोळात वाढत असलेले अतिक्रमण, ऐन हिवाळ्यात उद्भवणारी पाणी टंचाईसह यासह अन्य असुविधांचा सामना करावा लागत आहे. हि बाब स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकार्यांना माहित असताना ग्राम सुविधा देण्याकडे कमी व रस्ते बांधकामाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याची ओरड नागरीकातून केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी ग्राम स्वच्छतेचा नारा देत उत्‍तम आरोग्‍यासाठी स्‍वच्‍छतेशिवाय पर्याय नाही असे सांगून सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला जिल्हाभरातील गाव - गावातून मोठा प्रतिसाद दिला जात असताना हिमायतनगर शहरात मात्र शहर सफाई तर सोडा उलट नाली सफाईतून निघालेली घाण हि दोन ते तीन दिवस मुख्य रस्त्याच्या दोन्ही कडेला पडून असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. खरे पाहता हिमायतनगर ग्राम पंचायतीने सर्व प्रथम विशेष स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात पुढाकार घेवून सर्वाना यात सहभाग घेण्याचे आवाहणं करणे गरजेचे होते. कारण अस्‍वच्‍छतेमुळेच अनेक आजार जडत असतात. म्‍हणुन अस्‍वच्‍छतेच्‍या लढाईसाठी सर्व गावक-यांनी एकत्रीत घेवून ग्रामपंचायतीने स्वच्छ शहर.. सुंदर शहर... हि संकल्पना राबविवि. त्याद्वारे शहरातून सफाई केलेल्या घाणीची तातडीने विल्हेवाट लावण शारावासियाना सुरक्षित आरोग्य प्रदान करावे अशी मागणी व्यापारी, शहरातील नागरिक व बाहेर गावाहून येणाऱ्या मधून केली जाता आहे.

साथीचे आजार जडण्याची भीती
-----------------------------------
गत अनेक दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते, व गल्ली बोलीतील नाल्या जाम झाल्या असताना देखील नालीतीन घाण सफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेल्याने नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून शहर परिसरात डायरिया, मलेरिया, डेंगू, चिकन गुनिया यासह अन्य साथीचे आजार पसरण्याची शक्यता बळावली आहे. शहर व ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याचे रुग्नाच्या गर्दीवरून दिसत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी