कापूस जनावरांना चारवीला

हताश शेतकर्याने उभा कापूस जनावरांना चारवीला


हिमायतनगर(अनिल मादसवार) नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झाला बसण्यास सुरुवात झाली असून, पावसाअभावी पिके अनेक रोगांना बळी पडून वळत आहेत. या प्रकारामुळे कपाशीचे उत्पन्न निघण्याची अशा मावळ्याने हिमायतनगर तालुक्यातील एका हताश शेतकर्यांनी शेतातील उभ्या कापसात चक्क जनावरांना सोडून जगायचे कसे असा गंभीर प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. आजघडीला शेतकर्यांना उभा कापूस जनावरांना चारावावा लागत असले तरी शासन मात्र कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाच्या झाला बसण्यास सुरुवात झाली असून, केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा चार जनावरांना शिल्लक आहे. नंतर पशुधन सांभाळायचे कसे, हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. उसनवारी करून पेरलेल्या पिकांना पावसा अभावी काहीच आले नाही, आले त्यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. आता शेतात उभे असलेल्या कापसाच्या पिकांना पाणी नसल्याने बोंडासह झाडे वाळू लागली आहेत. तर अनेक रोगांनी कापसासह, तुरीच्या पिकांना घेरले आहे. तर पाऊस पडता नसल्याने अनेकांनी रब्बीच्या आशेने सोयाबीनची काढणी करून रान तयार केली मात्र. जमिनीत ओलावा राहिला नाही, म्हणून रब्बीची अशाही मावळली आहे. कापूस असलेली झाडे रोगांच्या बळी पडल्याने हताश शेतकरी आता कापसाच्या पिकात जनावरे चरण्यास सुरुवात केली आहे. असे पिक वळून जाण्यापेक्षा जनावरांचा चारलेला बरा..म्हणत कशाचीही तमा न बाळगता उभ्या पिकात जनावरे सोडून कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र हिमायतनगर तालुक्यात दिसून येत आहे.

हि परिस्थिती पाहता आता तरी शासन हिमायतनगर सह नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसगट नुकसान भरपाई देईल काय..? असा प्रश्न दुष्काळाच्या गडद छायेत अडकलेल्या बळीराजा विचारीत आहे. जिल्ह्यात महसुलमंत्री एकनाथ खडसे यांचा दौरा होत असल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील काय..? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी