दिव्याखाली अंधार

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी म्हणवी तसी झाली नसल्याने हिमायतनगर ग्रामपंचायतीचा कारभार.. दिव्याखाली अंधार असे म्हणण्याची वेळ गावकर्यांवर आली असून, शहरातील बाजार चौक व चौपाटीत बसविण्यात आलेल्या सौर उर्जेचे दिवे अजूनही सुरूच झाले नसताना एजन्सीने बिले अदा कोणत्या आधारावर करण्यात आली..? असा प्रश्न ग्रामस्त विचारीत आहेत.

सन २०१३-१४ मध्ये हिमायतनगर शहरात जी.प.अंतर्गत निधीतून विजेची बचत व्हावी आणि रात्रीला दिवसाचा प्रत्यय यावा या उद्दात हेतूने शहरात शेकडो दिवे बसविण्यात आले. तसेच तालुक्यातील अनेक गावात समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आठ ते दहा अश्या प्रमाणात सौर दिवे मंजूर करण्यात आले होते. परंतु बहुतांश गावात सौर दिवे न बसविताचा जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या निधी घश्यात उतरविण्याचा प्रयत्न त्या - त्या भागातील जी.प.सदस्यांना हाताशी धरून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

असाच काहींसा प्रकार हिमायतनगर शहरातील सौर उर्जेच्या दिव्याबाबत घडला असून, शहरातील पोलिस स्थानकाजवळील बाजार चौकात आणि रात्रीला १० वाजेपर्यंत गजबजून राहणारी शहरातील चौपाटी भागातील ग्रामीण रुग्णालयाजवळ असे दोन मोठे सौर दिवे वर्षभरापूर्वी बसविण्यात आले आहेत. सदरचे सौर उर्जेचे दिवे बसविणाऱ्या पुण्याच्या एजन्सीने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे दिव्याचे काम केले आहे. दिवे बसविण्यात आल्यापासून ते आजतायगात रात्रीला याचा उजेड पडला नसल्यामुळे दिव्याखाली अजूनही अंधारच असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरीकातून पुढे येत आहेत. एवढेच नव्हे तर बसविण्यात आलेल्या दिव्याच्या बैटर्या गायब झालेल्या असून, दिव्यावरील सौरउर्जा आकर्षित करून वीज साठविणाऱ्या प्लेट सुद्धा उडून गेलेल्या प्रत्यक्ष दर्शी दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी केवळ खांब, सौर दिवा, पेट्या आणि लोखंडी प्लेटचा सांगाडा शिल्लक असल्याचे चित्र दिसत आहे. हा सर्व प्रकार ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

शहरातील अनेक प्रभागातील चौका - चौकाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सौर दिवे बंद पडले असून, शहानिशा केली असता या दिव्याच्या बैटर्या चोरीला गेल्याने दिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. सौर दिवे बसविणाऱ्या एजन्सीकडे पाच वर्ष गैरंटीची व दुरुस्तीची हमी असताना बंद पडलेले दिवे सुरु करण्याची तसदी घेतली जात नसल्याने शासनाच्या योजना अधिकारी व राजकीय पुढार्यांच्या स्वर्थासाठीचा आहेत काय..? असा सवाल ग्रामस्त विचारीत आहेत. अनेकदा दिवेबंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या संबंधिताना दिली मात्र पाहुत, करुत, एजन्सिवाल्याना सांगतो, असे आश्वासने मिळत असल्याने दिवाळीतही या दिव्याखाली अंधारचा असल्याचे दिसून आले आहे. शासनाची हि सौ दिव्याची योजना हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात कुचकामी ठरत असल्याचा आरोप विकासप्रेमी नागरीकातून केला जात आहे.

याबाबत हिमायतनगरचे ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, आम्ही संबंधित एजन्सीला दिवे बंद झाल्याची माहिती दिली. दिवाळीमुळे ते येऊ शकले नाहीत, तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेले दिवे लवकरच सुरु होतील.

या बाबत गटविकास अधिकारी गंगावणे यांच्याशी विचारणा केली असता सौर दिव्याचे ते काम आमच्या अखत्यारीत येत नसून, जिल्हा परिषद सदस्य व संबंधित एजन्सी आणि ग्रामपंचायतीचे आहे. त्याची दुरुस्ती व चालू आहेत कि नाही हे त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी