भगवाच फडकणार..!

हदगाव - हिमायतनगर मध्ये भगवाच फडकणार..!

हदगाव/हिमायतनगर(वार्ताहर)सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान शांततेत संपन्न झाल्यानंतर सर्वत्र विधानसभेचे निवडणुकीचा अंदाज बांधला जात आहे. हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात फक्त भगवाच फडकणार असल्याची चर्चा कार्यकर्ते, मतदारांचा चावडी, चौक- चौकातील चर्चेतून ऐकावयास मिळत आहे.  

सन २००९ च्या निवडणुकीपासून शिवसेनेत प्रवेश करून नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात सर्व लहान, थोर, वयोवृद्ध नागरिक, युवकांच्या जनसंपर्क वाढविला. कोणतीही सत्ता नसताना एका सत्ताधार्याला लाजवेल असे सामाजिक, धार्मिक कार्य त्यांनी करून सामन्यांची सहानुभूतीची मिळविली होती. हीच सहानुभूतीची लाट त्यांना या निवडणुकीत फायद्याची ठरली असून, त्यामुळेच नागेश पाटील यांचा विजय हि काळ्या दगडावरची रेष असल्याचे ग्रामीण भागातील दुधवाले, शेतकरी, लहान - मोठे व्यापारी, मजूरदार यांच्या तोंडून बोलले जात आहे. 

गत निवडणुकीत शिवसेनेचा बालेल्कील्ला असलेला मतदार संघ हा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याच्या सहानुभूतीला जनतेने साथ देवून काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील यांना निवडून दिले होते. पाच वर्षाच्या काळात त्यांनी कोट्यावधीची विकास कामे केली, परंतु त्यांच्या विकास कामांना त्यांच्या सोबत असलेल्या चांडाळ चौकडीने दृष्ठ लावले त्यामुळेच बहुतांशी विकास कामे अजूनही कागदोपत्रीच आहेत. त्यातच त्यांनी केलेला विकासाच्या डोंगराचा गवगवा पाहून सामान्य मतदारांनी या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्याचे ठरविले. आणि छोट्या मोठ्या कामासाठी दलाली तथा मीच आमदाराच्या जवळचा म्हणवणाऱ्या मिनी आमदारांचे नाक ठेचून काढण्यासाठी शिवसेनचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाला पसंती देत भागव्याकडे कौल दिल्याचे सामान्य मतदार सांगित आहेत.     

तसेच भारिपचे उमेदवार बळीराम भुरके यांचा ग्रामीण भागात चांगला प्रभाव पडल्याने आदिवासी पट्टा संपूर्ण एकक गट्टा मतदान हे त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र मतदानाच्या दरम्यान दिसून आले आहे. तर काँग्रेस मधून नाराज होऊन बिएसपीच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले जाकेर चाऊस यांना ग्रामीण भागातील मुस्लिम, दलित बांधवांनी कौल दिल्याने काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजपचा पाहिजे तेवढा परिणाम जाणवला नाही, मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना शिवसेनेकडे वळविल्याचे बोलले जात आहे. एकूणच हे सर्व चित्र पाहता हदगाव - हिमायतनगर मतदार संघात भगवाच फडकणार..! असल्याचे बोलले जात आहे. मतदान संपल्यानंतर रात्री ०९ वाजल्यापासून यावर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि पैजा लावल्या जात आहेत. दि.१९ रविवारी मतमोजणी होणार असल्याने रविवारी दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी