शिवसेनेचाच नारा

हिमायतनगरच्या गणेश मिरवणुकीत शिवसेनेचाच नारा   

हिमायतनगर(प्रतिनिधी)दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील गणेश मंडळानी भव्य अशी मिरवणूक काढून मोरयाच्या गजरात निरोप दिला आहे. दरम्यान मिरवणुकीत लावण्यात आलेल्या सर्वचे डी.जे.संचावर कोण आला रे कोण आला..शिवसेनेचा वाघ आला.. या गाण्यांने परिसर दुमदुमू लागल्याने मिरवणुकीत सामील झालेल्या काँग्रेसच्या आ.महोदयांच्या समर्थकांना आमदार आलेत आता तरी गाणे बदला.. अशी केविलवाणी हाक देण्याची वेळ आल्याची एकच चर्चा शहर व तालुक्यात सुरु आहे.

बाप्पा गेले गावाला, लागा निवडणूक कामाला..असे म्हणत निवडणूक आयोगाने मंगळवारी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. याची माहिती व्हाट्स अप, फेसबुक, ट्वीटर वरून समजताच जिकडे तिकडे निवडणुकीच्या धामधुमीची चर्चा सुरु झाली. यालाच हेरून हिमायतनगर येथील गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झालेल्या युवकांनी हाती भगवे झंडे घेऊन " जय भवानी जय शिवाजी...शिवसेना जिंदाबाद..बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.. उद्धव ठाकरे तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है... अरे कोण आला रे कोण आला.. शिवसेनेचा वाघ आला...या धडाकेबाज गाण्यावर ठेका धरला होता. 

प्रती वर्षी गणेशाच्या व चित्रपटाच्या गाण्यावर मिरवणुकीत नाचणाऱ्या युवकांनी यावर्षी मात्र शिवसेनच्याच गाण्यावर ठेका धरून संपूर्ण मिरवणूक दणाणून काढल्याने देशात मोदी लाट तर.. तालुक्यात शिवसेनेची एकच लाट असल्याचे दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारात टक्कर होणार असून, कॉंग्रेसकडून विद्यमान आ.माधवराव पाटील, माजी जी.प. उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, मुस्लिम समाजाची वोट बैंक असलेले तथा अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जाकेर चाऊस यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु करून मतदार संघात भेटी गाठीवर भर दिला आहे. तर शिवसेनेकडून नागेश पाटील, पांडुरंग कोल्हे, लताताई कदम हे इच्छुक आहेत. मात्र अद्यापही दोन्ही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याने मतदार व युवकांना उत्सुकता आहे ती शिवसनेच्या उमेदवाराच्या नावाची.           

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी