रस्ते झाले खड्डेमय

नेत्यांच्या आगमनानंतर रस्ते झाले खड्डेमय 



हिमायतनगर(वार्ताहर)येथील विविध शासकीय इमातीचे उद्घाटन करण्यासाठी मागील आठवड्यात दिग्गज नेत्यांचे आगमन होत असल्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली मुरूम व मातीचा वापर करून बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा जैसे ठेच झाल्याने वाहनधारक व पादचार्यांना मार्ग क्रमान करताना कसरत करावी लागत आहे. 

शहराच्या वैभवात भर टाकणारे ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपनिबंधक कार्यालयाच्या इमातीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा काँग्रेसचे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. नेयांचा प्रवास सुखकर व्हावा व केलेल्या कामास शाब्बासकी मिळावी म्हणून सावजानिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली माती व मुरुमाचा वापर करून तकलादू पद्धतीने खड्डे बुजविण्याचे कार्य पार पाडले होते. नेते आले आणि गेले खड्डे पुन्हा जागे झाले असे चित्र हिमायतनगर - भोकर राज्य रस्त्याच्या चाळणी वरून दिसून येत आहे.

माण्यावाना प्रावास कताना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागली नसेल, मात्र हलक्याश्या पावसाने माती - मुरूम वाहून गेले खड्डे पुन्हा सक्रिय झाले असा अनुभव सामान्य नागरिकांना, वाहनधारकांना येत आहे. रस्त्यावरून जाणारे वाहन भाधव वेगात जाताना पाई चालणाऱ्या  नागरिकाच्या अंगावर चिखल व पाणी उडत असून, त्यामुळे चालणार्या वाहनाचा अंदाज घेत स्वतः सुद्धा खड्ड्यात जाणार नाही याचा अंदाज घेत मार्ग काढावा लागत आहे. 

परंतु नेत्यांच्या आगमनाच्या नावाखाली रस्त्याची थातुर माथुर दुरुस्ती करून, यासाठी झालेला खर्च किती..? बहुतांश निधी अभियंत्यांच्या घश्यात उतरविण्यात येउन शासनाच्या तिजोरीला हलून  उखळ पांढरे करण्यात आले कि काय..? अशी चर्चा वाहनधारक, पादचारी यांच्या माध्यमातून सुरु आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी