न्यायालयाच्या निकालात दडलंय काय..?

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार राजीव सातव यांच्या निवडीला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. मुझफ्फर (बिहार) कोर्टातील गुन्हेगारी खटल्याची माहिती उमेदवारी अर्ज; तसेच शपथपत्र सादर करताना जाणीवपूर्वक दडवली, असा आक्षेप घेत निवड रद्द करण्याची विनंती निवडणूक याचिकेत करण्यात आली आहे. याच मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांनी ही याचिका सादर केली आहे. हा बांब पडणारच असे मतदारांनी आणि दस्तुरखुद राजीव सताव यांनीही गृहीत धरले होते. आता न्यायालयाच्या लढाई नंतर सातव यांचे भवितव्य ठरणार आहे. तरीही न्यायालयाच्या निकालात दडली काय ?असा प्रश्न या मतदार संघातील मतदारांच्या मनात निर्माण होणार आहे.

निर्भय व मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्व प्रलंबित गुन्ह्यांची माहिती सादर करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. ही माहिती त्यांनी दडवली नसती तर ते १६३२ मतांनी विजयी झाले नसते. त्यामुळे सातव यांनी मतदारांची फसवणूक केली असून, त्यांची निवड रद्द करण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. अॅड. वसंतराव साळुंके यांच्यामार्फत वानखेडे यांनी याचिका सादर केली आहे.राजीव सातव यांना लोकसभा निवडणुकीत निसटता विजय मिला होता. आणि त्यांच्या विजयाने क्न्ग्रेसचा एक उमेदवार वाढून महाराष्ट्रात कांग्रेसचे दोन खासदार विजयी झाले होते. सातव निवडणूक हरले आसते तर एकमेव खासदार अशोक चव्हाण हेच कांग्रेसचे खासदार विजयी झालेले बघायला मिळाले आसते.

नरेंद्र मोदी यांनी कांग्रेसमुक्त भारताचा नारा लावला होता. तो नारा महाराष्ट्रात लोकांनी विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र,खानदेश असा सर्वच प्रादेशिक विभागातील मतदारांनी खरा करून दाखविला होता. पण मराठवाडा संतांची नव्हे तर संथांची भूमी असल्याने मोदी लाटेवर मात करीत कांग्रेसचे दोघेजण विजयी झाले होते. त्यात एक नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण आणि हिंगोलीचे उमेदवार राजीव सातव पण या दोन्ही उमेदवारांपैकी एका उमेदवारास म्हणजे राजीव सातव यांच्या निवडीस शिवसेनेचे माजी खासदार आणि उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आव्हान दिल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.या खटल्याचा कलावधी किती यावर सातव यांही खासदारकी आणि तिचे भवितव्य अवलंबून असणार आहे.आणि न्यायालयाने वानखेडेच्या बाजूने निकाल दिला तर मात्र कांग्रेसचा एकच खासदार महाराष्ट्रातून लोकसभेवर शिल्लक रहणार आहे.मोदी यांनी आपल्या संसदेतील पहिल्याच भाषणात गुन्हेगार मुक्त संसद अस्तित्वात कशी येवू शकेल हे सांगितले होते त्यानुसार न्यायालयाने गुन्हे दखल असलेल्या खासदारांवरचे खटले मर्यादित वेळात संपवून दुध का दुध आणि पाणी का पाणी करावे आसे म्हटले होते.

त्यानुसार खटले चालले तरी राजीव सातव दुहेरी अडचणीत येणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत, श्री गुरुगोविंद सिंघाजी यांची शपथ घेऊन आदर्श घोटाळ्यात सैनिकाच्या विधवांची जमीन हाडप करून मुंबईत आदर्श बिल्डिंग उभी करणारांना, आदर्श घोटाळ्यातील आरोपींना आपण सत्तेत आलो तर सोडणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे आधीच पेड न्यूजची धास्ती घेतेलेले अशोक चव्हाण यांचीही खासदारकी अडचणीत येऊ शकते. कारण डी बी पाटील यांनी निवडणुकीच्या निकाला नंतर म्हटले होते की, नांदेडमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. याचा अर्थ जे कांग्रेस उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत ते दुसऱ्यांदा निवडून येतीलच याची हमी देता येणार नाही. कारण आज मराठवाड्याचा मूड कांग्रेस राष्ट्रवादी विरोधात आहे काल मराठवाड्यात पालिका व महापालिकांच्या निवडणुकात सर्वत्र महायुतीच्या उमेदवारांनीच विजय मिळविला आहे. शिताहून भाताची परीक्षा केल्यास विधान सभा निवडणुकीत कांग्रेस व राष्ट्र्वादी काय परिस्थिती मराठवाड्यात असेल याचे चित्र या निवडणुकांतून स्पष्ट झालेले आहे. महायुतीच्या सरसीत कांग्रेसला धडकी भरली आहे.​ 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी