महिला बचत गटाचा यल्गार...

दारूबंदीसाठी आन्देगावच्या महिला बचत गटाचा यल्गार...


हिमायतनगर(शहर प्रतिनिधी)दारूच्या आहारी गेलेल्या बापच्या धाकाने दारूच्या बॉटला आणून देता देता आता अल्पवईन मुलेही दारूच्या आहारी जात असल्याचे पाहून आन्देगाव येथील शेकडो महिलांनी एकजूट होऊन दारू बंदीसाठी येथील महिला बचत गटाच्या पदाधिकारी सदस्य व अन्य महिलांनी यल्गार पुकारला आहे. तातडीने दारू विकी बंद करावी या मागणीसाठी हिमायतनगर पोलिस स्थानकात निवेदन सदर केले.

मागील अनेक वर्षापासून आन्देगाव येथील काहीं जन अवैद्य रित्या देशी दारूची विक्री करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोल मजुरी करून खाणारा मजूर वर्ग व गरीब शेतकरी दारूच्या आहारी गेला असून, मद्यधुंद अवस्थेत दारू आणण्याचे काम चिमुकल्या तथा अल्पवईन मुलांना दारु आणावयास लावले जात आहे. पैनामी एक - दोन वेळेस दारू आणण्यासाठी गेलेली हि अल्पवईन मुलेही दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागत आहेत. एवढेच नव्हे दारू विकणार्यांची संख्या वाढत असल्याने गावात दारूचा महापूर वाहत आहे. त्यामुळे गावात दारूच्यांचा धुमाकूळ माजविला असून, मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणे, मानसिक त्रास देणे, घरच्या पत्नीला मारहाण करणे, पैसे न दिल्यास महिलांना घराबाहेर काढणे असे अनेक प्रकार घडत आहे. त्यामुळे गावातील अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागत असून, गावातील शांतता भंग झाली आहे. या प्रकाराला थांबविण्यासाठी येथील सोनिया गांधी, हिरकणी महिला बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन अवैद्य दारू विक्रीच्या विरोधात यल्गार पुकारला आहे. येथील दारू विकेत्यांवर कठोर कार्यवाही करून गावातून कायाम्रूपी दारू हद्दपार करावी अशी मागणी महिलांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावर संजीवनी भूसावले, सुनिता सामलवाड, पेन्तुबाई आचारवाड, ज्योती हटकर, गंगाबाई डोईवाड, लक्ष्मीबाई नरकुलवाड, चंद्रकलाबाई हटकर, धुरपताबाई आलेवाड, उज्ज्वला उप्पलवाड, कांताबाई शेळके, पुण्यरथाबाई निळकंठे, सौमित्राबाई सूर्यवंशी, धुर्पताबाई मच्छलवाड, मंगलबाई भुसावले, कलावतीबाई सामलवाड,विमलबाई बचेवार, चंद्रकलाबाई निळकंठे, आदींसह शेकडो महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी