सर्वसामान्य हदगांवकर सरसावले.....

सुभाषरावासाठी सर्वसामान्य हदगांवकर सरसावले.....

हदगांव(शिवाजी देशमुख)लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांच्या खोटया प्रचाराला बळी पडु नये म्हणुन हदगांव शहर व हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्या व्यतिरिक्त खा. सुभाष वानखेडे यांना चाहणारे विविध जाती-धर्म-पंथाचे नागरीक पदरमोड करत हिंगोली लोकसभेच्या वेगवेगळया मतदार संघात प्रचारासाठी रवाना झालेले आहेत.

तीन वेळा आमदार, एक वेळा खासदार राहीलेल्या खा. सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक, भाजप, रिपाई(आठवले), स्वा.शेतकरी संघटना यांच्या कार्यकर्त्यां व्यतिरिक्त सामान्य नागरीकही आपली पदरमोड करत आपआपल्या पाहुण्यांना सुभाष वानखेडे यांच्यासाठी मते मागतांना दिसत आहेत. त्यात मुस्लीम, बंजारा, वाणी, अदिवासी, नवबौध्द, मातंग यासारख्या जाती-धर्मातील लोकांचा समावेश आहे. सदर प्रचारक किनवट, माहुर, उमरखेड, महागाव, वसमत, कळमनुरी, औंढा, हिंगोली या ठिकाणी प्रचारास जात आहेत.

खा. सुभाष वानखेडे यांच्या बद्दल विरोध-कांकडुन चालविलेल्या खोटा प्रचाराला बळी पडु नये असे आवाहन या प्रचारकांकडुन करण्यात येत आहे. खा. सुभाष वानखेडे यांच्या आमदारकीच्या काळात अतिवृष्टी होवुन पैनगंगा नदीस महापुर आला असतांना त्या पुरपिडीतांना सुरक्षित जागी हलविण्यासाठी शासनास भाग पाडुन तात्काळ हेलिकॅप्टर व्दारे पुरपिडीतांना सुरक्षित जागी हालविण्याच्या कामी स्वत: होवुन केलेली मदत व त्यानंतर झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी शासनाशी एकतर्फी लढा देवुन शेतकर्‍यांना मदत मिळवुन दिली. तसेच हिमायतनगर तालुक्याचे निर्मिती सुभाष वानखेडे यांच्यामुळेच झाली तर हदगांव नगर पालिकेत अल्पसंख्याकाला पदे देण्यात आली. तालुक्याच्या 5 वर्ष सत्तेत तर 10 वर्ष विरोधी बाकावर बसुन वानखेडेनी काय-काय विकास साधला हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत.

त्यात जि. प. नांदेड, हदगांव पंचायत समिती, नगर पालिका अश्या स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळया जातीधर्माच्या अत्यंत तळागाळातील लोकांना दिलेले प्रतिनिधीत्व हा प्रचाराचा ठळक मुद्दा असुन वानखेडे यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांची अनेक वेळा केलेल्या कामाची या प्रचारात आठवण करुन देण्यात येत आहे. तसेच केंद्रसरकार कडुन मागील पाच वर्षात रस्ते विकास केलेल्या कामाची, रेल्वेचे सोडविलेले प्रश्‍न असे अनेक मुद्दयांची मागील पाच वर्षात वेगवेगळया वृतपत्राच्या बातम्यांचे कात्रण या प्रचारकांच्या सोबत घेवुन फिरत आहेत. रेल्वेमार्गाचा विकास झाल्याशिवाय या भागातील लोकांचा विकास होणार नाही ही दुरदृष्टी ठेवुन मागील पाच वर्षाच्या कामात वारंवार रेल्वे मंत्र्यासोबत भेटीगाठी घेवुन निवेदने देवुन व संसदेत या प्रश्‍नाला वाचा फोडल्यामुळेच अनेक रेल्वेमार्ग मार्गी लागल्याचे या प्रचारकाकडुन पुरावे दाखवित सांगण्यात येत आहे. धनशक्तीच्या बळावर खोटा प्रचार करुन सुभाष वानखेडे यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आम्ही हाणुन पाडु असेही या प्रचारकाकडुन सांगण्यात आले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी