भाजपाला मिळणार बिन प्रचाराची लीड

लोहा - कंधार तालुक्यात भाजपाला मिळणार बिन प्रचाराची लीड

लोहा(ज्ञानोबा नागरगोजे)लोकसभेचे वारे आता जोरात वाहायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदीची देश व्यापी लाट कॉंग्रेस ची धूळधाण उडविणार असे काहीसे चित्र लातूर लोकसभेत येणाऱ्या लोहा व कंधार या दोन तालुक्यात निर्माण झाले आहे. तर प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत लोहा व कंधार या दोन तालुक्यात भाजपा ला बिन प्रचाराची मोठी लीड मिळते हा इतिहास आहे. तर या दोन्ही तालुक्यातील कॉंग्रेस चे मातब्बर जीवाचे रान करून मेहनत घेत असताना देखील त्यांना लीड मिळत नाही यंदा तर नमोची लाट एवढी प्रचंड आहे कि लोहा व कंधार मधून मोठे मताधिक्क्य मिळण्याची शक्यता राजकीय सूत्राकडून वर्तविली जात आहे.

लोहा व कंधार या दोन्ही तालुक्याचा समावेश लातूर लोकसभेमध्ये झालेला आहे. नांदेड जिल्ह्यात असून देखील त्यांना लातूर च्या उमेदवारास मतदान करावे लागते.लातूर-नांदेड चे राजकीय मतभेद जगजाहीर आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मात्र मतभेद नसल्याचे केवळ देखावे केले जातात.हे सर्व सामान्य जनतेला देखील ज्ञात आहे. मात्र पक्षात अंतर्गत मतभेद नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून केला जातो. नांदेड विरोध काही केल्या संपत नाही.लातूर ची रेल्वे नांदेड पर्यंत येवू देण्यास लातूर करांनी केलेला विरोध आता विसरून कसा चालणार अशाही सूर समोर येत आहे.भाजपा च्या लाटेची ढग कमी करण्यासाठी कॉंग्रेस कडून नामांकित व्यक्तींना तिकीट देण्यात आले आहे.तर आदर्श प्रकरणात अडकलेले अशोक चव्हाण यांना देखील तिकीट देवून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्ता हडपण्यासाठी पुढाकार घेतल्याचे आपणास दिसून येईल.

मात्र लोहा व कंधार या दोन तालुक्याने भाजपा ची साथ कधी हि सोडलेली नाही मागील लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे सर्वच नेते मैदानात उतरलेले असताना देखील या उलट भाजपा चा एकही मोठा नेता या दोन तालुक्यात फिरकला नाही तरी देखील लोहा व कंधार या दोन तालुक्याने भाजपा ला मोठी लीड येथून दिली हे विशेस.सद्या देशात नरेंद्र मोदी ची लाट असून युवकांची त्यांना साथ आहे असे चित्र तूर्त दिसून येत आहे. भाजपा चे मातब्बर नेते लोह्यात नाहीत तरी देखील लोहा व कंधार या दोन्ही तालुक्याकडून मिळणारी लीड म्हणजेच हे दोन्ही तालुके भाजपा चा बालेकिल्ला आहेत असे म्हणायला हरकत नाही.कॉंग्रेस कडून लातूर बरोबरच नांदेड ची सीट देखील वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कॉंग्रेस आतून प्रचंड घाबरलेले आहे. हे येथील वास्तव आहे आणि हे सर्वानाच मान्य करावे लागणार आहे. तर यंदा देखील लोहा व कंधार तालुक्यातील युवा मतदार हे भाजपा च्या बाजूने असल्याने अधिक लीड मिळणार असल्याचे चित्र सद्या तरी निर्माण झाले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी