श्रीकृष्णाची काठी

श्रीकृष्णाची काठी भक्तांच्या दर्शनासाठी दाखल

हिमायतनगर(वार्ताहर)दहा दिवसाच्या भ्रमंतीला निघालेल्या कार्ला येथील श्री कृष्णाच्या काठीचे शहरात आगमन होताच भाविक - भक्तांनी जोरदार स्वागत करून भक्तिभावे दर्शन घेतले आहे.

वाढत्या स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येक माणूस भौतिक सुख मिळविण्यासाठी जीवाचा आता पिता करून पैसा मिळविण्याकडे धावत आहे. त्यामुळे मानसिक समाधान हरवून बसला असून, मनशांती लोप पावली असून आपली संस्कृती विसरू लागला आहे. खरे समाधान प्राप्त करावयाचे असले तर भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हाण्याशिवाय पर्याय नाही. अशीच इसःवर भक्तीची ओढ लागलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पी.येथील कृष्ण मंदिराची काठी १० दिवसाच्या भ्रमंतीला निघाली आहे.

मागील अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या चालत आलेली धार्मिकतेची परंपरा जोपासत कार्ला पी. येथील कृष्ण मंदिराची काठी प्रती वर्षी महाशिवरात्री निमित्त काढण्यात येते. या दिनी निघालेली हि कृष्णाची काठी हलगीच्या तालावर वाजत गाजत हिमायतनगर व उमरखेड तालुका परिसरातील खेड्या - पाड्यात फिरविली जाते. काठी गावात दाखल होताच भक्तांचा जत्था काठीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. भक्ती भावाने दर्शन घेवून पूजा - अर्चना करून अन्नदान, दक्षिणा आदी देतात. काठी सोबत हलगी, अंगारा व दहा ते बार भक्तांचा संच असतो. शहर गावातील मुख्य कमानीजवळ तथा चौक -चौकात हलगीच्या तलावात काठीची उंच हातही धरून भक्तगण नाचतात. हे दृशा अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असते. दहा दिवसानंतर दि.०८ शनिवारी परत कार्ला पी. गावात येवून भव्य महाप्रसादाच्या पंगतीने समारोप केला जातो. दि.०२ रविवारी शहरात कृष्णाची काठी दाखल झाली असून, अनेकांनी दर्शन घेवून जोरदार स्वागत केले आहे. या काठीसोबत रामराव लुम्दे, परसराम इठेवाड, रामराव बर्लेवाड, आदींसह अन्य भक्तगण आले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी