गाराचा तडाका;

लोहा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पाऊस,गाराचा तडाका;
रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान











*वादळी वाऱ्याने महाकाय झाडे उन्मळून पडली
*विजेचे खांब आडवे झाल्याने वीजपुरवठा खंडित. 
*घरावरील पत्रे उडाली तर शेतीतील पिके हातची गेली. 

लोहा(ज्ञानोबा नागरगोजे)गत आठवडा भरापासून अवकाळी पावसाने लोहा तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे.पावसामुळे काढणीला आलेला गहू ,हरभरा व कांदा पिकांचे यापूर्वीच अतोनात नुकसान झालेले असताना आज पहाटे व दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने हातचे पिक पूर्णतः गेले वादळी वारा व गारामुळे झाडे उन्मळून पडली तर वीज पुरवठा खंडित झाला. 

यंदा लोहा तालुक्यातील शेतकर्यांना पहिल्यांदाच लीम्बोटी धरणाचे पाणी शेतीसाठी केनालद्वारे सोडण्यात आल्याने रब्बी चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गहू, हरभरा,व कांद्याच्या पिकाची यंदा विक्रमी लागवड झाली होती. पिक काढणीला आले असतानाच अवकाळी पावसाने आपली वक्रदृस्ठी शेतीकडे वळविली.वादळी वाऱ्याने गहू अक्षरश अडवा झाला.तर हरभर्या सह कांद्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. गत आठवडा भरापासून पावसाची नित्यनेमाने हजेरी चालूच असून दि.६ मार्च रोजी रात्रभर चाललेली पावसाची रिपरिप पहाटेच्या वेळी अधिकच आक्रमक झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.तर आस्टूर, रिसनगाव, सावरगाव परिसरात गारपीट झाली .वादळी वाऱ्याने तालुक्यातील महाकाय झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प झाली होती.तर वादळी वार्यामुळे वाजेचे खांब आडवे झाल्याने तार तुटून लोहा तालुक्यातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला .लोहा शहरातील वीजपुरवठा सदरील वृत लिहीपर्यंत कमी दाबाने चालू होता. वादळी वार्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. गत एक आठवड्यापासून पावसाचा नंगा नाच चालू असून शेतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण,कधी पाऊस तर कधी उन असा खेळ चालू आहे.

एकंदरीत रब्बी हंगामासह आंबे, व इतर पिकासाठी अवकाळी पाऊस धोकादायक ठरला असून काढणीला आलेले पिक हातचे गेल्याने शेतकर्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी खते,बी-बियाणे,व कीटकनाशकासाठी केलेला खर्च अवकाळी पावसामुळे पुरता पाण्यात गेला असून निसर्गाचे हे संकट शेतकर्यासाठी शाप ठरले आहे.
                                                                                         गजानन नागरगोजे,

                                                                                         कांदा उत्पादक शेतकरी,लोहा.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी