कुस्तीचा फड

बिद्राळीच्या संजय उमाटेने श्री परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड जिंकला


नांदेड(अनिल मादसवार)51 हजाराच्या कुस्त्याचा फड तळपत्या उन्हात रंगला भारतात प्रसीध्द श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फडास दि.13 मार्च गुरुवारी सकाळी 10 वाजता बालमल्लाच्या संत्र्या मोसंबीच्या कुस्तीने सुरुवात झाली. यामद्ये शेवटची अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती संजय उमाटे बिद्राळी याने जिंकुनसबंध जिल्हाभरात नाव झळकवीले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व कुश्ती शौकीनांनी अभीनंदन करुन डोक्यावर घेऊन भव्य मिरवणुक काढली होती. 

लहान मोठ्या बालकांच्या कुस्त्या सकाळी 10 वाजल्यापासुन सुरु झाल्या त्यात 10, 20, 30, 50,100,200 रुपयाच्या कुस्त्या सुरु होत्या.शेवटची मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी 4001 रुपये व 3001 रुपयाचे बक्षीस बजरंग दलाच्यावतीने कै.कल्याण चवरे यांच्या स्मरणार्थ ठेवन्यात आली होती. ही कुस्ती संजय उमाटे व दशरथ तोरणा या दोघाच्या तुल्यबळ लढतीत संपन्न झाली. हलगीच्या तालावर सुरु असेलल्या कुस्तीच्या फडाच दशरथला चित्थ करुन बिद्राळीच्या उमाटे ने अव्वल नंबरचा मान मिळऊन कुस्तीचा फड जिंकला आहे. तसेच दुस-या नंबरची 3001 रुपयाची कुस्ती तुल्यबळ लढतीमुळी अनीर्णीत राहीली, त्यामुळे गंगाधर मांजरम व हरीश सेलगांव या दोघांना विभागुन देण्यात आले आहे. तसेच तिस-या नंबरची 2001 रुपयाची कुश्ती राजु बीतऩाळ याने जिंकली.

त्यानंतर 1001 रुपयाच्या 10 कुस्त्या, तसेच वैयक्तीक कुश्ती शौकीनांनी लावलेल्या 1000 व 500 च्या अश्या मिळुन 51 हजार रुपायाच्या कुस्त्या तळपत्या उन्हात यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने, मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या उपिस्थतीत पार पडल्या. यामध्ये सिबदरा येथील 10 वर्षीय चिमुकलीने 100 रुपयाच्या तीन कुस्त्या जिंकुन हम..भी किसी से कम नही..असे दाखऊन दिले आहे. कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी हदगंाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड सह अन्य दुर-दुरच्या ठिकाणाहुन हजारों पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. प्रथम कुस्ती पटकावीणा-या पैलवानास वर उचलुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत बॅेडबाज्याच्या गजरात श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त मिरवणुक काढली. मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री महावीरचंदजी श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, विठलराव वानखेडे, माधव पाळजकर, आनंता देवकते, मुलचंद पींचा, प्रकाश कोमावार, सरपंच पुत्र ज्ञानेश्वर शिंदे, अन्वर खान, बाबुराव होनमने व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पैलवानास बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी हानुसींग ठाकुर, सरदार खान, गजानन चायल, मारोती हेंद्रे, राजु गाजेवार, बाबुराव पालवे, बाबुराव भोयर, नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनील मादसवार, प्रकाश शींदे, कानबा पोपलवार, दत्ता शिराणे, प्रेमकुमार धर्माधीकारी, अनिल भोरे, अशोक अनगुलवार, धम्मपाल मुनेश्वर, शाम जक्कलवाड, गजानन चायल, यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती. कुस्तीचा फड व यात्रेतील सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक सोनवणे व पोलीस उपनीरीक्षक सुशील चव्हाण यांनी दंगल नियंत्रन पथकासह 30 पोलीसांचा कडा बंदोबस्त लावला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी