‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द

‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द झाली प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे प्रतिपादन 


नांदेड(प्रतिनिधी)इलाहींच्या गजल मराठी मनाचा ठाव घेणारी आहे. वास्तवाचे दर्शन करुन देणारी आहे. आनंद, ओढ, विरह, मोहकणे, थिरकणे, हे सर्व प्रकार त्यांच्या गजलेत असून इलाहीच्या साहित्यातून मराठी विश्‍वातील गजल खर्‍या अर्थाने समृध्द झाली आहे, असे भावपूर्ण उद्गार प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक राजदत्त मायाळू यांनी काढले.

जागृती सामाजिक प्रतिष्ठाण व सांस्कृतिक विचार प्रबोधन मंडळाच्यावतीने शनिवार दि. १ मार्च रोजी कुसुमसभागृहात गजलकार इलाही जमदार यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ घेण्यात आला. यावेळी राजदत्त बोलत होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती गजलकार इलाही सोबत प्रसिध्द शायर बशर नवाज, कवि प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भीमराव शेळके,गंगाधरराव शक्करवार, मंत्रालयीन कक्ष अधिकारी विकास कदम, अमरावतीचे मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. इलाही जमदार यांच्या समग्र गझल साहित्यावर विवेचन करतांना राजदत्त म्हणाले की, मानवी जीवनातील वास्तवाचे विविध रंग इलाहीच्या गझलेत आहेत. नसानसात भिणणारे आहेत. आनंद देणारे आहेत म्हणूनच ते वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.

मराठी जीवनाशी, भावनांशी, वास्तवाशी जवळीक साधणार्‍या इलाहींच्या गझला मराठमोळ्या रसिकांशी संवाद साधतात, म्हणून ते प्रतिभावान गझलकार झालेत. इलाहीबद्दल प्रेमव्यक्त करतांना प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी म्हणाले की, शपथ घेतो मीच माझी, मी न योगी, जाणतो की मी एक कफ्ल्लक जोेेेगी, यातनांचा मिच स्वामी, मीच भोगी, अजूनही सोसायची आस जागी, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

सत्कारमूर्ती यावेळी नांदेडकरांनी केलेल्या या सत्काराने भारावून गेले. गहिवरुन गेले. भावना व्यक्त करतांना आनंदाश्रू त्यांना आवरता आले नाही. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष कवी जगन शेळके यांनी केले. सूत्रसंचालन लातूरचे अशोक डोंगरे यांनी तर डॉ. रामवाघमारे यांनी आभार मानले. प्रा. विकास कदमयांनी मानपत्राचे वाचन केले. तत्पुर्वी इलाहींच्या अनुष्का, अनुराग, गुप्तगु, निशींगध आदी पाच पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.या गौरव सोहळ्याला दिल्ली, कलकत्ता, मुंबई, बेळगाव, औरंगाबाद, पुणे, नागपूर, वर्धा या ठिकाणाहून त्यांचे चाहते आले होते. शेवटी प्रसिध्द गझल गायक शेख रफी यांनी निशींगध तुझा प्रेमाचा दरवळे हृदयात माझ्या...या लोकप्रिय गझलेने कार्यक्रमाची समाप्ती झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी