शेतकऱ्याची आत्मत्त्या

गारपीट व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्मत्त्या


नांदेड(अनिल मादसवार)एका ६० वर्षीय शेतकऱ्याने नुकत्याच झालेल्या गारपिटीत नुकसानीत आलेले पिक   व कर्जाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना मौजे कोहळी ता.हदगाव येथे घडली. या घटनेमुळे ऐन सणासुदीत गावकर्यांवर शोककळा पसरली आहे.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हदगाव तालुक्यातील कोहळी परिसरातील मयत शेतकरी यादव चंपती वय ६० यांच्या शेतातील रब्बीची पिके गेली. तसेच गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीने खरीपातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बैन्केचे घेतलले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत मयत यादव चंपती वय ६० याने शेतातील गुरांच्या गोठ्यातील पत्राखालील लाकडी दान्द्यास नायलॉन  दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. 

मागील १५ दिवसापासून मयत शेतकरी हा कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होता, याबाबत अनेकदा मुल्बालांची चर्चा केली होती. या चिंतेत व्यतीत असताना दि. १६ रोजी कोहळी शिवारातील शेतात गळफास घेवून जीवन यात्रा संपविली. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत बालाजी यादव पतंगे यांनी दिलेल्या खबरीवरून हदगाव पोलिस स्थानकात कलम१७४ सी.आर.पी.सी.अनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कोंस्तेबल चव्हाण करीत आहेत. 

गारपिटीने नुकसानीत आलेल्या शेतकर्यांना मदत देण्यात अद्याप शासन असमर्थ ठरले असून, शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. या आठवड्यात लोहा, भोकर नंतर हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची हि जिल्ह्यातील तिसरी घटना होय..!

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी