वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...

हिमायतनगर तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...
पिके आडवी, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान


हिमायतनगर(अनिल मादसवार)शहर व तालुका परिसरात शनिवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून विजांच्या गडगडटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसाबरोबर तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मागील आठ दिवसापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजविला आहे. त्याचा फटका हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा न.१,२, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणी सह सरसम, पळसपूर, डोल्हारी, कारला, सवना, टेंभी, खडकी बा., वडगाव, जीरोणा, पवना, एकघरी या ग्रामीण भागात बसला होता. त्यामुळे कापून ठेवलेला हरभरा, करडी, उभा गहू आडवा होवून, हाती आलेल्या संत्र्या -मोसंबीची फळे गळून पडली आहेत. यामुले शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असताना हिमायतनगर तालुक्यातील नुकसानीची साधी दाखलही घेतल्या गेली नसल्याची खंत काही शेतकर्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलून दाखविली. 

दुसऱ्यांदा शनिवारी वादळी वाऱ्यासह गारांच्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, गारांचा पाऊस तालुक्यातील फुले नगर, पळसपूर, डोल्हारी, टेंभी, सह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी झाला. गारांचा आकार मोठा असल्यामुळे झाडांची पाने गळून पडली, शेतातली पिके आडवी झाली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेला प्रवास उशिरापर्यंत सुरू होता. सकाळपर्यंत या गारा विरघळल्या नव्हत्या. त्यामुळे शेतात पिकांऐवजी गारांचा थर दिसत होता. गहू, करडी, हरबरा हि पिके गारपीटीने उध्वस्त झाली. तालुक्यातील शेतकरी गेल्यावर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीच्या गारपीटीने मेटाकुटीला आला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानीची मदत मिळवून द्यावी अशी रस्त मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

तहसीलच्या रामभरोसे कारभारामुळे शेतकर्यात संताप येथील तहसील कार्यालयात सध्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. एकीकडे निवडणुकींची कामे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा सामना त्यातच येथील कारभार पाहणाऱ्या तहसीलदार यांचे पद भरलेले असून, रिक्त आहे. त्यामुळे तहसीलचा कारभार रामभरोसे चालविला जात असल्याने, नुकसान शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेणार कोणी वालीच उरला नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेताकार्यातून व्यक्त होत आहे. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नेत्यांचे दुर्लक्ष आठ दिवसाच्या काळात हिमायतनगर तालुक्याला दोन वेळा अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. परंतु तालुक्याच्या जबाबदार एकही नेत्यांनी नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. नेत्यांच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत शेतकरी व सामान्य नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत असून, याचा फटका आगामी निवडणुकीच्या काळात त्यांना बसणार एवढे मात्र खरे. 

शहरात झालेल्या जोरदार पावसाने यात्रेकरूंची तारांबळ महाशिवरात्री महोत्सवानिमित्त हिमायतनगर येथे मोठी यात्रा भरविण्यात आली असून, मागील आठ दिवसापासून यात्रेवर ढगाळ वातावर व पावसाचे सावट पडले आहे. त्यामुळे रंगात आलेल्या यात्रेत अचानक सुरु झालेल्या पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. शनिवारी वादळी - वाऱ्यासह सुरु झालेल्या पावस्मुळे व्यापारी व यात्रेकरूंची चांगलीच तारांबळ उडाली होती. या वादळी पावसामुळे बर्याच्या व्यापार्यांचे पाल, तीन शेड अस्ताव्यस्त झाल्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी