बैंकेत ग्राहकांची कुचंबना

भारतीय स्टेट बैंकेत ग्राहकांची कुचंबना ...दलालांची मात्र चलती

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील भारतीय स्टेट बैंकेत अधिकारी कर्मचार्यांकडून ग्राहकांना नाहक त्रास देवून पिटाळून लावण्यात येत असून, दलालांची कामे मात्र विनाविलंब करण्यात येत असल्याची ओरडा ग्राहकांकडून होत आहे. या प्रकाराकडे जिल्हा प्रबंधकाने लक्ष देवून ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करावी अशी मागणीही जोर धरत आहे.

अधिकारी - कर्मचार्यांच्या मनमानीचा त्रास ग्राहकांना सोसावा लागत असून, बैन्केचा व्यवहार करण्यासठी दलालांची मदत घ्यावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी असो वा अन्य कोणत्याही कामासाठी थेट बैंकेत जाणार्या ग्राहकांना येथिल अधिकारी आणि कर्मचारी नियमांवर बोट ठेवून पिटाळून लावत आहेत. तेच काम जर दलालांमार्फत पाठविल्या गेले तर मात्र विनाविलंब होत आहेत. फक्त यासाठी मात्र येथे येणाऱ्या ग्राहकास आर्थिक झळ सोसावी लागते. खिश्यात पैसे नसल्यावर बैंकेत जाणारे ग्राहक आता खिश्यात पैसे असेल तरच बैंकेत जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

शाखा व्यवस्थापकाचा मात्र अजबच तोरा दिसून येते ग्राहकांच्या कामाचे त्यांना काही देणे नाही न घेणे नाही. फक्त नियमांवर बोट ठेवून कागद काळा करायचा व दिवस घालवायचा एवढेच काम. शासनाचा विविध योजनांसाठी मिळणारा शासनाचा निधी, महिला बचत गटांना मिळणारे कर्ज, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती असो कि, शेतकर्यांना देण्यात येणारे पिक कर्ज असो, अश्या अनेक योजनांचा निधी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत नसून, विविध महामंडळाचे कर्जाच्या असंख्य फाईली मनमानी करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या टेबलावरच तुंबल्याने गरजू लाभार्थ्यांची अवहेलना होत आहे.

बैंकेत खाते उघडणे, पासबुक वेळेत न देणे, कर्जाचे वेळेत वाटप न करणे, बैंकेत येणाऱ्या महिला बचत गटांच्या महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, ए.टी.एम.कार्ड मिळाले असताना खाते पुस्तिका देण्यास टाळाटाळ करणे, खातेदाराचे नातेवाईक पुराव्यासह पुस्तिका मागणी केली असता, नियमाचे कारण समोर करणे आदी कामात बैन्केतील अधिकारी - कर्मचार्यांकडून वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेक ग्राहकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

हिमायतनगर शहरात सर्वात मोठी बैंक म्हणून नावारूपाला असलेली भारतीय स्टेट बैंक अधिकारी आणि कर्मचार्यांच्या मनमानीमुळे बदनाम होत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बैंक आणि सध्या कात टाकलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक यांच्या शिवाय शहरात अन्य एखादी राष्ट्रीयकृत बैंक चालू करण्यात यावी अशी मागणीही ग्राहकांमधून केली जात आहे.

दलालांकडून ५०० रुपये दिल्यास घरपोहोंच खाते पुस्तिका 

मागील दोन महिन्यापूर्वी पत्नीच्या नावाने खाते काढण्यात आले, बैंकेत खाते मागणीसाठी चार वेळा गेलो, मात्र बैन्केतील अधिकारी कर्मचार्यांनी पुराव्याचे कागद पत्रे आणण्याचे सांगितले. कागदपत्रे घेवून येताच पत्नीला घेवून या असे...सांगून खाते पुस्तीका देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमच्या गावात काही दलालांकडून ५०० रुपये दिल्यास घर पोहोंच खाते दिले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया सिरंजणी येथील नागरिक धम्मपाल मुनेश्वर यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी