नादब्रम्हची मैफिल रंगली

परमेश्वर मंदिर यात्रेत नादब्रम्हची मैफिल रंगली ..
चिमुकल्यांच्या गीतांना श्रोत्यांची भरभरून दाद

हिमायतनगर(वार्ताहर)येथील परमेश्वर मंदिरच्या यात्रेत विविध कार्याक्रमची रेलचेल सुरु असून, येथील नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संगीतमय कार्यक्रमांची मैफिल रंगली होती. चिमुकल्या कलाकारांनी गायिलेल्या गीतांना उपस्थितांनी भरभरून साथ दिल्याने कार्यक्रम रंगतदार ठरला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कलाकार श्री प्रकाश शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांची उपस्थिती होती. संगीतमय कार्यक्रमात दिव्या रायेवार, आर्द्रिका सूर्यवंशी, गौरी जन्नावार, प्रदीप अंकुश अर्जुन हनवते, श्रद्धा राखे, सतीश मोरे, यांनी गायन सदर केले. त्यात अशी चिक मोत्याची माळ... अरे कृष्णा( भारुड) पायोजी मैने राम रतन धन पायो.. माझी रेणुका माउली... अशी भक्तीपर रचना सदर केल्या. तर प्रथमेश मादसवार आणि क्षितिजा गुंडेवार यांनी तबला वादन सदर केले. त्यासोबतच अनंत पुणे कार्यक्रमातील हरी सुंदर नंद मुकुंद, वेडा मराठे वीर दौडले सात... सारे जहां से अच्छा.. अश्या सामुक गीत सदर करून उपस्थित श्रोतेगनांची दाद मिळविली. कार्यक्रमाच्या शेवटी साईनाथ टाले, राजेश गजलवाड यांनी जलसा, पोवाडा असे गीते सदर केली. कार्यक्रमाची सांगता प्रणव पडवळे आणि परमेश्वर तीप्पणवार यांनी केली. या कार्यक्रमास साथ देऊन उत्साह वाढविण्याचे कार्य तबला ढोलकीवर सचिन बोम्पीलवार, हार्मोनियमवर गोविंद वाघमारे, आणि निवेदन प्रा.सूर्यप्रकाश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन नादब्रम्ह विद्यालयाचे संचालक श्री प्रशांत बोम्पीलवार यांनी केले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी