डी.बी.च्या उमेदवारीने

डी.बी.च्या उमेदवारीने कहीं ख़ुशी... कहीं गम...

नांदेड(प्रतिनिधी)नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे माजी खा.डी.बी.पाटील यांच्या उमेदवारीने काही अंशी उत्साहाचे तर काही ठिकाणी नाराजीचे सूर आळवले जात आहेत.

अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात राहणारे माजी राज्यमंत्री व २००४ च्या निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिलेले डी.बी.पाटील अचानक काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. परंतु गोपीनाथ मुंडेच्या राजकीय खेळीने राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा काट्याने काढत डी.बी.ना स्वग्रही ओढले. नांदेड लोकसभा मतदार संघात अशोक चव्हाणांचे प्राबल्य पाहता दुसरा उमेदवार येथे तग धरणे शक्य नव्हते. हे गोपिनाथारावानी ओळखून ज्यांनी अपरंपार पक्षावर निष्ठा ठेवली अश्या कार्यकर्त्यांना सांदिला टाकत कालच राष्ट्रवादीला सोड्चीट्टी देवून भाजपात दाखल झालेल्या डी.बी.पाटील यांना उमेदवारी देवून शहकाटशहाचे राजकारण केल्याच्या प्रतिक्रिया भाजपातून उमटल्या, असल्यातरी अशोक पर्वापुढे कठोर आव्हान उभे करण्याशिवाय पर्याय नसल्याचे गोपीनाथराव यांच्या लक्षात आल्याने डी.बी.च्या उमेदवारीचा डाव खेळला असल्याचे बोलले जात आहे.

पक्ष निष्ठा कायम असलेल्या डी.बी.पाटील हे नांदेड लोकसभा मतदार संघात मोठ्या मताधिक्याने यशस्वी होतील असा विश्वास काहींनी व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपली दाळ शिजणार नसल्याचे व उमेदवारी मिळणार नसल्याचे अवगत होताच स्वहित जोपासण्यासाठी राष्ट्रवादीला सोड्चीट्टी देवून भाजपात प्रवेश केला असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्ये याचा वचपा निवडणुकीत काढतील व अशोकारावना त्याचा फायदा होईल अश्या प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून पुढे येत आहेत. अशोकराव विरुद्ध डी.बी.असा थेट सामना झाल्यास अशोकारावांपुढे डी.बी.चा टिकाव लागणार नसून भाजपला हि जागा गमवावी लागेल. तर काँग्रेसने अन्य उमेदवार दिल्यास डी.बी.पाटलांचा विजय निश्चित होईल असा विश्वास आम जनतेतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी