2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त

स्थानिक गुन्हा शाखेने पकडले दोन अट्टल चोरटे
2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त

नांदेड(अनिल मादसवार)नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने 2 चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून जवळपास 2, 63 हजार 900 रुपयाचा अैवज जप्त केला आहे. या पैकी एक चोरी सन 2012 मध्ये झाली होती. आणि एक 2013 मध्ये झाली होती. या दोन्ही चोऱ्या दिवसा झाल्या होत्या.

दि. 20 सप्टेंबर 2013 रोजी लक्ष्मीनारायण तरोडा (बु) येथील जयश्री संजय जैस्वाल या आपल्या वस्तीगृहातील नोकरीवर गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून सोन्या, चांदीच्या दागीण्यासह रोख रक्कम असा एकूण 1 लाख 89 हजार 100 रुपयांचा एैवज चोरला होता. हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल होता.

पोलीसांनी या चोरीचा मार्ग काढत कुंडलवाडी ता. बिलेाली येथील राजेंद्र मुन्नजी अकुलवार वय 31 याला स्थानिक गुन्हाशाखेने पकडले त्यांच्याकडून पोलीसांनी 4 तोळे वजनाचा सोन्याचा हार , 12 ग्रॅम वजनाचे मिनीगठन, चांदीचे पैजन, असा एकूण 5 तोळे सोने व 200 मीलीग्रॅम चांदीचा एैवज असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयाचा अॆवज हस्तगत केला.

दि.18 मे 2012 रोजी जयभवानीनगर येथे राहणारे गंगाधर संभाजी पवार यांच्याघरी झालेल्या चोरीत 1 लाख 2हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिणे व इतर किंमती एैवज चोरीला गेला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हाशाखेने आकाश प्रताप सरोदे वय 20 रा. स्वप्नभूमीनगर, ता. कंधार याला पकडले, त्यांच्याकडून 74 हजार 800 रुपयांचा एैवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक परमजितसिंह दहीया व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांच्या नेतृत्वात पोलीसउपनिरीक्षक अनिल अदोडे, पोलीस कर्मचारी बळीराम दासरे, पिराजी गायकवाड, दिनानाथ शिंदे, रमाकांत शिंदे, बालाप्रसाद जाधव, सय्यद फईम, देविदास चव्हाण, धिरज कोमुलवार, शे.खाजा, सातपुते, रवि कांबळे आदिंनी प्रयत्न करुन या चोरट्यांना जेरबंद केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी