आनंद मेळावे

कौशल्य वाढीसाठी आनंद मेळावे .. गटशिक्षण अधिकारी सुरजुसे

हिमायतनगर(वार्ताहर)विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी सर्व शाळांनी चिमुकल्या बालकांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासठी आनंद मेळावे घ्यावे असे आवाहन गटशिक्षण अधिकारी एस.एस.सुरजुसे यांनी केले. ते हिमायतनगर शहरातील जी.प.कन्या शाळेतील आनंद मेळावा कार्यक्रमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे, माजी मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पं.स.अस्थापना विभागातील पतंगे आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना देण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त जी.प.कन्या शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले आहे. त्यापैकी आनंद मेळावा हा कार्यक्रम कार्यक्रम दि.२३ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गटशिक्षण अधिकारी एस.एस.सुराजुसे यांनी केले. यावेळी चिमुकल्या बालकांसाठी आनंदाची पर्वणी असलेल्या आनंद मेळाव्यात उत्साहपूर्ण वातावरणाने १३५ बालकांनी सहभाग घेऊन विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाचे स्टोल उभे केले होते. गुलाब जामुन, चिवडा, सामोसा, इटली - वडा, चना, पेडा, पोहे, पापड, पाणी पुरी, आदींसह विवध प्रकारच्या खाद्य वस्तूंची विक्री करून खरी - कमाई केली. तसेच एकमेकांचे व्यंजन खरेदी करून खाद्य पदार्थाचा अस्वादहि घेतला. यावेळी पत्रकार कानबा पोपलवार, पांडुरंग गाडगे, दिलीप शिंदे, शेकडो पालक, विद्यार्थी आदींसह अनेकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. बी. पाटील सर, बी.एस.राठोड सर, एस.दि.गायकवाड सर, ए.पी.बोइले, जी.बी.जावळे, सौ.एस.एम.पानपट्टे, जी.एस.गुंडाळे, एम.पी.बेजरंगे, ए.के.कोरेकलकर, एस.के.चिबडे, अ. आला अ.अजीज, सेविका व्ही.पी.कडेम यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी