अपहार प्रकरणी कार्यवाहीसाठी उपोषणाचा चौथा दिवस... उपोषणकर्त्यासोबत गटविकास अधिकार्याची उद्धटपणाची वागणूक
हिमायतनगर(अनिल मादसवार)समाजमंदिर व तंटा मुक्त भवनाचे बांधकाम न करताच विद्यमान सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाणे पावणे पाच लाखाचा अपहार केल्याचा अहवाल देणारे खुद्द गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे यांनी स्वार्थासाठी अपहार कर्त्यांना अभय दिले आहे. सदरचे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने तिसर्या दिवशी उपोषण स्थळी भेट देवून उपोषण सोडा असे म्हणून दिशाभूल करणारे पत्र दिले. माघार घेण्यास नकार देणाऱ्या उपोषण कार्त्यांसोबत उद्धट पणाची वागणूक दिल्याने भ्रष्ठाचार करणार्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप उपोषण कर्त्यानी पत्रकारांशी बोलताना करून वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे........