समारोप

ज्ञानेश्वर माउली...ज्ञानराज माउली तुकाराम....च्या गजरात शिवमहापुरान कथेचा समारोप


हिमायतनगर(अनिल मादसवार)श्रावण मासाच्या पवित्र महिन्यात श्री परमेश्वर मंदिरात मागील १० दिवसापासून सुरु असलेल्या शिवमहापुरान कथा सप्ताहाचा समारोप ज्ञानेश्वर माउलीच्या गजरात करण्यात येउन दहीहंडी फोडण्यात आली. याप्रसंगी मंदिर सभाग्रह महील - पुरुष भक्तांनी खचाखच्च भरले होते.

पुण्य पदरी पडून घेण्याचा पवित्र श्रावण मासात हिमायतनगर(वाढोणा)येथील श्री परमेश्वर मंदिरात आयोजित शिवमहापुरान कथेचा शेवटचा दिवस गोड झाला आहे. परमपुज्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य महराज यांच्या मधुर वाणीतून संगीतमय शिवमहापुरान कथा वाचन सत्संग कार्यक्रमात हजारो महिला - पुरुष भाविकांच्या पदरी पुण्य पडल्याचा अनुभव आला आहे. सप्ताह दरम्यान शिव शंकरची महिमा, गणेश विवाह यासह श्री कृष्णलीलांचे वर्णन करून उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले आहे. आजच्या काळात होत असलेल्या स्त्री भ्रूण हत्या, गोहत्या, बाल विवाह, गुरूची आज्ञा पाळा, यासह हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. तसेच संत ज्ञानेश्वर माउलीची शिकवण आचरणात आना असा संदेश देऊन, त्यांच्या ओवीतून देऊन आचार विचार शुद्ध ठेऊन भक्तांनी वर्तन ठेवावे. असा मोलाचा उपदेश दिला आहे.

दरम्यान अन्नदानासाठी आश्रमास निधी देणाऱ्या भक्तांचे अभिनंदन व्यासपिठाचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी केले. दि.१६ काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात श्री कृष्णाच्या लीलांचे वर्णन करून दहीहंडी ने समारोप करण्यात आला. यावेळी दिन, दुख्यांना आनंद देणारा हा कला असल्याचे गजेंद्र महाराज यांनी सांगितले. जवळपास ३ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या भजनी मंडळ, स्वयंसेवक, कर्मचारी, गावातील नागरिक आदींचे आभार मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी मानले. येथील मंदिर समितीचे सेकेटरी राजेश्वर चिंतावार, संचालक लक्ष्मण शक्करगे, किशनरामलु मादसवार, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, प्रकाश कोमावार, मुलचंद पिंचा, अनंता देवकते, वामन बनसोडे, संभाजी जाधव, देविदास मुधोळकर, शाम पावणेकर, राजराम झरेवाड, माधवराव पाळजकर, लताबाई मुलंगे, लताबाई पाध्ये, मथुराबाई भोयर, बाबुराव भोयर, ग्रंथपाल प्रकाश साभाळकर आदींसह शहरातील व तालुक्यातील मान्यवर व्यक्ती व महिला - पुरुष भाविक उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी