पहील्या श्रावण सोमवारी 30 हजार भवीकांनी घेतले परमेश्‍वराचे दर्शन

पहील्या श्रावण सोमवारी 30 हजार भवीकांनी घेतले परमेश्‍वराचे दर्शन

हिमायतनगर (अनिल मादसवार) हर हर महादेव ...जय भोलेनाथच्या गजरात सकाळी ५ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणावासीयांचे श्रध्दास्थान शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांडनायक,देवाचे देव मानल्या जाणर्या श्री भोळ्या शंकरच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवाराचं व्रत कानार्यांसह हजारो पहिला- पुरुष भक्तांनी गर्द्दी केली. सायंकाळपर्यन्त जवळपास 25 हजार भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.

वृत्त वैकल्याचा महीना श्रावण मासाची सुरवात दि.07 बुधवार पासुन झाली आहे.यात आलेल्या पहील्या सोमवारी हजारो भावीकांनी दर्शनासाटी गर्दी केली होती. विदर्भ -मराटवाडयाच्या सिमेवर वसलेल्या हिमायतनगर(वाढेणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्‍वराचे मंदीर आहे. मंदीरातील भुयारात 705 वर्षापुवीची श्री परमेश्‍वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार आहे. भारतात कुटेही परमेश्‍वरची मुर्ती नसल्याने वाढोण्याच्या परमेश्‍वर दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, कर्नाटकासह दुर - दुरहुन भावीक भकत महाशीवरात्र, श्रावण मासात अवर्जुन हजेरी लावतात.मंदीरात लक्ष्मीनारायण, भव्य शिवलीग, निद्रीस्थ नारायण, भैरवनाथ, गणपती, हनुमान, आदिंसह अन्य देवी- देवतांच्या प्राचीन मुर्त्या आहेत. मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन, प्रत्येक सोमवार महाआरती केली जाते. आरती व दर्शनासाटी सायंकाळी शिवभकतांची मंदीयाळी होते.वर्षभर भावीक पुजा, अर्चना, महाअभीषेक व लग्न वीधीही या टीकणी करतात.मंदीर परीसरात पिंपळ, वड, उंबर, गुलमोहर, लिंब, बादाम आदिसह अन्य फुलांची झाडे आहोत.यामुळे श्रावण मासत मंदीरीचे सौदर्य खुलले असुन, परीसरातील वातावरण मंगलमय झाले आहे. मंदीर संस्थानकडुन महाशीवरात्रीला 15 दिवसाची भव्य यात्रा भरवीली जाते.विशेषता श्रावण मासात दर सोमवारी सकाळी 5 वाजताच भकत अभीषेक महापुजा करन पुण्य पदरात पाडुन घेतात.दरम्यान श्रावणात मंदिर समीतीने शिवमहापुरान कथासार धामीक पबोधनपर कार्यकम चालु केला असुन, कथा श्रवणासाटी भकतांची मंदियाळी होत आहे.

तसेच नागपंचमीचा सन सोमवारच्या पुर्वसंध्येला झाला असुन, श्रीयाळ उत्सव श्रावण सोमवारी आल्याने, महीलांनी शहरातील शेषनाग मुर्ती दर्शन, शिवनागनाथ मंदिर व पाटीमागील वारळाचे दर्शन व पुजानालाही महीलांनी तोबा गर्दी केली होती.शिवपती मंदिरातील गाभार्यात असलेल्या भव्य शिवलिंगाचे व भारतात एकमेव समजल्या जाणार्या उभ्या श्री परमेश्वर मूर्तीस हळद- कुंकू, बील्वपत्र, फुलाने पुजा -अर्चना करन लाहया फुटाने, नारळाचा प्रसाद चढऊन श्री दर्शन घेऊन अनेकांनी पुण्य प्राप्त केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी