महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मिती विषयी संभ्रमावस्था!
अनेक इमारती वर चालनार बुलडोझर!


माहुर, माहुर ते घोटी राज्य महामार्ग क्रमांक 265 चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे.रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने माहुर शहरा सह वाई, सारखणी,या मुख्य बाजारपेठेतील इमारती वर बुलडोझर चालणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

किनवट-भोकर ते राज्य सिमा अशा राष्ट्रीय राज्यमार्गाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असुन निविदा
हि निघाली आहे.आता दुसर्‍या टप्प्यात माहुर ते घोटी पर्यंत काम केले जाणार असल्याने या मार्गावरील रस्त्यालगत पन्नास ते साठ फुटावर असलेली सर्व बांधकामे जमिनोधोस्त होणारआहे.राष्ट्रीय महामार्गाचा निकशा प्रमाने चौदरी करणाचे काम सुरु होण्या पुर्वी रस्त्याच्या मध्य भागापासुन दोन्ही बाजुला नव्वद फुटांपर्यंत चे बांधकाम पाडावे लागणार या वृताने शहरात हलचल माजली आहे.तर काही विकासप्रेमी नागरीक रस्ता मोठा होणार असल्याने शहराच्या सुंदरतेत भर पडेल या बद्दल समाधानी आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केलेल्या  नागपूर -तुळजापूर मार्गाला धनोडा वरुन माहुर-अदिलाबाद ला जोडा अशी मागणी हिंगोली,व अदिलाबाद च्या खासदारांनी व किनवट चे आ.प्रदिप नाईक यांनी पत्राद्वारे नितीन गडकरी यांच्या कडे गत वर्षीच केली होती.या अनुषंगाने संबंधित यंत्रणेने या मार्गाचा सर्वे केला व रुंदीकरणाविषयक मोजमाप हि केल्याची माहिती मिळाली आहे. या मार्गात अनेक लहान मोठी गावे आहेत.हा मार्ग काही गावांच्या आतून तर काही गावांच्या बाहेरून जाणार आहे. हा मार्ग नेमका किती रुंद असेल याविषयी नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.मात्र अवघ्या दहा किमी वरुन जात असलेल्या तुळजापुर - नागपुर महामार्गाचे नियम पाहता माहुर शहरासाठी हि नव्वद फुटाचाच निकष लागेल या धास्तीने टोलेजंग इमारती च्या मालकांची झोपमोड झाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box