नांदेड



मनपाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाण्याची वाट लागत आहे
 
नांदेड, नांदेडकरांना यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईचा सामना करावा लागत नसला तरी मनपा प्रशासनाला मात्र नांदेडकरांची तहान भागविण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. हा सामना करून नुकतेच दुधना धरणातून पाणी उपलब्ध झाले पण आहे ते पाणी काटकसरीने आणि जपून वापरण्याची गरज असताना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वर्कशॉप कॉर्नर येथील जलकुंभाच्या शेजारी असणाऱ्या वॉलमधून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
                      सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नांदेडकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड शहराला विष्णुपूरी जलाशय आणि आसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाणी उपलब्ध करून दिले जाते. विशेषत: गेल्या वर्षी राज्यभर पाण्याची तीव्र टंचाई असताना नांदेडकरांना मात्र ही जाणवली नाही. तर यावर्षी कशी जाणवणार. केवळ दोन दिवसाआड पाणीपुरवठा करून आहे त्या पाण्यामध्ये नांदेडकरांना मे अखेरपर्यंत म्हणजेच नवीन पाणी येईपर्यंत पुरवण्याचा मानस करण्यात आला. यातच नांदेडकरांचे हक्काचे असणारे दिग्रसच्या बंधाऱ्यातून उपलब्ध करून घेतले पण विष्णुपूरीत येईपर्यंत खूपच अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. यामुळे नांदेडकरांना पाण्याचे संकट ओढावणार काय असा प्रश्न महापालिकेला  भेडसावत होता. यातच दुधना धर णातून पाणी उपलब्ध करून घेतले आणि नांदेडकरांनी एक नवे दोन तब्बल 60 दिवसांची तहान भागेल ऐवढे  पाणी आज वि ष्णुपूरीमध्ये उपलब्ध आहे. पण महापालिका हा सारा खटाटोप करत असताना विनाकारण दररोज हजारो लिटर पाणी थोड्याशा चुकीमुळे वाया जात आहे. हे लक्ष येत असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. वर्कशॉप कॉर्नर येथे जलकुंभ असून या जलकुंभातून अर्ध्या नांदेडकरांना पाणी उपलब्ध करून दिले जाते. पण त्याठिकाणी असणाऱ्या वॉलगळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी जवळच असणाऱ्या गटारामध्ये सोडल्या जात आहे. या वॉल दुरूस्तीकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देऊनही अधिकारी मात्र याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी महा पालिकेच्या दुर्लक्षामुळे विनाकारण वाया जात असल्याचे सध्यातरी वर्कशॉप कॉर्नर येथे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box