संचित रजेचा फरार कैदी संतोष धुतराजला एका जीवघेणा हल्ला प्रकरणात कोठडी

नांदेड (एनएनएल) सन 2010 मध्ये मारोती म्हेत्रेचा खून करुन जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर संचित रजेवर आलेल्या एका कैद्याने दुसऱ्या भावावर जिवघेणा हल्ला केला त्यासाठी दुसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.व्ही.सिरसाट यांनी त्या हल्लेखोराला दोन दिवस अर्थात 9 ऑगस्ट पोलीस कोठडीत पाठविले आहे.

काही दिवसापूर्वी तळणी शिवारात लातूर पोलिसांनी
गोळीबार करुन एका संचित रजेवरील कैद्याला पकडले होते. तो फरार होता. त्याला लिंबगाव पोलिसांनी पोलीस पथकावर हल्ला केला म्हणून 307 या कलमाखाली काही दिवस न्यायालयाच्या आदेशाने पोलीस कोठडीत ठेवले होते. हस्तांतरण वारंट मिळवून भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस कर्मचारी विलास कदम, दिपक कुल्थे, कुंभरवार,वाघमारे आणि समद पठाण यांनी आज पॅरोलवरचा फरार कैदी संतोष माधवराव  धुतराज यास न्यायालयात हजर केले. पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सन 2010 मध्ये संतोषने मारोती मेहेत्रेचा खून केला होता त्याप्रकरणात संतोष आणि इतर दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. एप्रिल 2015 मध्ये संतोष धुतराज कारागृहातून संचित रजेवर नांदेडला आला. त्यावेळी त्याने खुन केलेला मारोती मेहत्रेचा भाऊ शंकर मेहत्रे आणि त्याच्या पत्नीला अनेकदा धमक्या दिल्या. त्याबाबत शंकर मेहत्रेने तक्रार दिली होती. दि.13 ऑगस्ट 2015 रोजी शंकर मेहत्रेला संतोष धुतराज प्रभातनगरमध्ये दिसला. ही बाब पोलिसांना सांगण्यासाठी शंकर मेहत्रे जात असताना वर्कशॉप कॉर्नरजवळ रात्री अकरा वाजता एक मोटारसायकल त्याच्या पाठीमागून ज्यावर संतोष धुतराज पाठीमागे बसलेला होता. संतोषने तलवारी आणि लोखंडी रॉडच्या साह्याने शंकर मेहत्रेवर हल्ला केला. आपल्याला स्वतःला वाचवून शंकर मेहत्रेने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला होता. तेंव्हा मोटारसायकल, लोखंडी रॉड आणि तलवार तेथेच टाकून संतोष धुतराज आणि त्याचा अनोळखी साथीदार दोघे पळून गेले होते. त्यावेळी संतोष धुतराज आणि एका अनोळखी माणसाविरुध्द भादंविच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला. सरकारी वकील ऍड. मोहंदम रजियोद्दीन यांनी संतोष धुतराजसोबत दुसरा हल्लेखोर कोण होता याची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. न्या.सिरसाट यांनी संतोषला 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी