माजी खा. सुभाष वानखेडे यांनी दरेसरसम तलावाचा प्रस्ताव मंत्रालयात रेटला

शेतकऱ्यांसह घेतली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट 


हिमायतनगर (एनएनएल) मागील सात वर्षांपासून रखडलेल्या दरेसरसम - पवनाच्या मध्ये जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या सुना तलावाचा प्रश्न माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या पुढाकारामुळे मार्गी लागणार आहे. लवकरच काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याने शेतकऱ्यांच्या अश्या पल्लवित झाल्या आहेत.

तालुक्यातील मौजे दरेसरसम तलावाचा प्रश्न गेल्या ७ वर्षांपासून शेतकरी व शासनाच्या मधील
समन्वयाभावी रखडलेला आहे. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून येथील सेवानिवृत्त वनाधिकारी बाबुराव बोड्डेवाड यांच्यासह आंदेगांव, टेंभी, पार्डी, सरसम,पवना, दरेसरसम, या गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन मोर्चे आंदोलन केले. तसेच आजी माजी नेत्यांची भेट घेतली मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही. मागील २० वर्षांपासून शेतकऱ्यांचा कार्यासाठी धडपडणारे माजी खा. तथा आ. सुभाष वानखेडे यांची भेट घेतल्यानंतर या तलावाच्या रखडलेल्या प्रश्नाला गती आली असुन, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली. यावेळी माजी खा. सुभाष वानखेडे यांनी रखडलेल्या तलावाचा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव मांडला, यास जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शेतकर्‍यांची मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे आस्वासन दिले. यामुळे साठवण तलावाचे काम पुर्णत्तवास जाणार असून, या भागातील हजारो एकर जमीन पाण्याखाली येऊन उन्हाळ्यातील पाणी टंचाईपासून मुक्ती मिळणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत बाबुराव बोड्डेवार, विजय नरवाडे, सुधाकर पाटील, परमेश्वर गोपतवाड, सोपान बोम्पीलवार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. सादर तलावाचे काम पूर्ण झाल्यास हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी माजी खा. सुभाष वानखेडे यांचे आभार मानले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी