डॉ विकास केंद्रेची पोलीस कोठडी तिसऱ्यांदा वाढली

नांदेड (एनएनएल) जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांचा मुलगा डॉ.विकास केंद्रेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेंद्र सोरते यांनी तिसऱ्या वेळेस  10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.

सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, त्यांची पत्नी, मुले डॉ.विकास आणि डॉ.तुषार, मुलगी प्रतिक्षा, एक खाजगी रुग्णालयाचा डॉक्टर आणि एक सेवक अशा लोकांविरुध्द त्यांनी डॉ.विकासची पत्नी डॉ.चेतनाला कोरे इंजेक्शन खून
केल्याची तक्रार डॉ.चेतनाचे वडील पोलीस उपनिरीक्षक राजू इंगळे यांनी दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या सर्वांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. 1 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिसांनी डॉ.विकास पद्माकर केंद्रे (26) यास न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास 8  ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पोलीस हवलदार गोविंदे मुंढे, उमेश राठोड, पोलीस कर्मचारी शंकर मैसनवाड, देविदास डोईजड यांनी पोलीस कोठडी संपलेल्या डॉ.विकास केंद्रेला आज ८ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. साहेबराव नरवाडे आणि सरकारी वकील ऍड.श्रीकांत भोजने यांनी या खुन प्रकरणातील डॉ. विकास केंद्रेंचा मोबाईल जप्त केला आहे आणि सिन कार्ड जप्त केले आहे अशी माहिती दिली. डॉ.चेतनाला दिलेले रिकामे इंजेक्शन जप्त करणे आहे. सोबतच डॉ.विकास केंद्रेने बनविलेली एक चित्रफित जप्त करणे आहे आणि इतर फरार आरोपींचा शोध घेणे आहे यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याचा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश महेंद्र सोरते यांनी डॉ. विकास केंद्रेला 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी