महाविद्यालयीन स्तरावर संशोधनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध

संधीचा फायदा घेण्याचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांचे आवाहन 

नांदेड (एनएनएल) राजीव गांधी सायन्स अँड टेकनॉलॉजी कमिशन, मुंबई यांच्या मार्फत संशोधनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत असते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शिफारस केल्यानंतर आर्थिक सहाय्य मिळत असते. महाविद्यालयीन स्तरावर शेती विषयक, सांडपाणी विषयक इत्यादी समाज उपयोगी कोणताही विषय घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करुन आर्थिक सहाय्य मिळवावे. ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. यासंधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन  कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. 

ते आज दि.८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाशी व्हिडीओ कॉन्स्फरसिंग (व्हीसी)द्वारे संवाद साधतांना बोलत होते. 'महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६' आणि 'सीबीसीएस' (क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम) याविषयावर आज त्यांनी संलग्नित सर्व महाविद्यालयाशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी नवीन विद्यापीठ कायद्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठ परिसरातील सर्व संकुले आणि सर्व योजनांबद्दल माहिती दिली. पुढे ते म्हणाले, आपल्या भागातील विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठीही मोठ्या शहराकडे धाव घेतात. बाहेर देशातील विद्यार्थी आपल्या विद्यापीठाला प्राधान्य देतात याचे कारण बाहेरून येणारे विद्यार्थी आपल्या विद्यापीठाचा पूर्णपणे अभ्यास करतात मगच ते प्रवेश निश्चित करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाची निवड करतांना त्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा जेणे करून स्वतःचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही. सीबीसीएस अभ्यासक्रमाच्या फायद्याविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी ७४ महाविद्यालये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन होते. त्यामधून अनेकांनी कुलगुरूंना प्रश्न विचारले. त्यासर्व प्रश्नांना उत्तरे कुलगुरूंनी दिली. ए-व्हीवद्वारे आजचे व्हिडिओ कॉन्फरसिंग यशस्वीरीत्या पार पडली. याचे श्रेय विद्यापीठातील संगणक तज्ञ सचिन नारंगळे, सुनील जाधव, संदीप टाकनखार यांना जाते.       

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी