माझी आई

अहो ते तुम्ही लग्नाच्या वेळेला म्हनता ना, सात जन्म मला हिच बायको मिळु दे किंवा सात जन्म हाच नवरा मिळु दे... हो हो तुम्हाला नक्कीच मिळेल, पण ज्या आईने आपल्यासाठी नऊ महीने सतत दुःख सहन केले त्या आईबद्दल आपन कधी अस म्हटल आहे का की सात जन्म मला ह्याच मायेच्या पोटी जन्माला येऊ दे...असो तो आपआपला जिवनाचा भाग आहे म्हणा अथवा न म्हणा.

मी माझ्या भावना या लेखातुन व्यक्त करतोय... मला अस वाटत सात जन्मातला हा माझा कदाचीत दुसरा जन्म असावा,कारन पहील्या जन्मात मी खुप चांगल कार्य केलेल असेल म्हनून देवाने आज मला तुझ्यासारख्या प्रे़मळ मायेच्या पोटी जन्म दिला. आई तु मला नऊ महीने काचेच्या प्यालावानी वागवलयं.माझ्यासाठी खुप काही दुःख सहन केली असनारचं.आई आज मी समजदार झालोय,आज मी समजतोय तुझ दुःख,आज तुला माझी खुप गरज आहे. लाहानपनी मला भुख लागायची तेव्हा तु मला जेवु घालायची,मला ताहान लागायची तु आठवनीने पाणी पाजायची.आई माझ्या जिवनातील सगळं काही सुःख हे फक्त तुझच आहे.

बाकी मुलानवानी मी ञास नाही देनार तुला,फक्त माझी एकच विनंती आहे आई तुला, पुढील पाच जन्म मला तुझ्याच कुषीत जन्माला येवु देजो. आई तु तुझ्या वयाची शंभरी जरी गाठली तरी मी सर्वांना ईतकच सांगेल की मी आईकडे राहतोय कारन तु माझ्याकडे राहाव ईतका मी सुखी नाही.तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यातच रमलेला तुला दिसेल. मिञांन्नो, खुप दुःख सोसले रे आपल्या आईने आपल्यासाठी,सतत नऊ महीनेे तीच्या कुशीत वागवुन आपल्यासाठीच कामाला जता होती  ती, आपला बापलतर रोज शेतात न्यायचा रे तीला ती पन शेतात अतोनात काम करायची, कोनासाठी तर फक्त आपल्यासाठी. तिला नेहमी वाटायच माझा मुलगा खुप मोठा डाँक्टर, इंजिनीयर, वकील होईल, मला खुप चांगल वागवेल. पन आपन नेमक त्या विरोधात वागतोय तिच्याशी. 

बस आपन समजदार झालो किंवा पैसे कमावायला लागलो, एकदाची आपल्याला बायको मीळाली की बस झाल, कोन आई- बाबा आपन त्यांच्याकडे मरेपर्यत लश्र देत नाही, माझ्या म्हनायचा ऊद्देश असा नाही की, सर्व मुल ही असी असतातचं पण शंभर पैकी एक तरी नक्कीच अशी असतात, ज्यांना आपल्याला जन्म दिलेल्या माय बापाची लाज वाटु लगाते.पाठवुन देतो आपन त्यांना वृद्धाशमात ,नका रे त्यांच्या जिवासी अस खेडु,खुप सोसलय त्यांनी आपल्यासाठी,घर दार विकल त्यांनी आपल्या शिश्रणासाठी,ते जेवत नव्हते आपल्याशीवाय कधीच आणी आज बगा आपन आता पैसे कमावायला लागलो तर मायबापाला पन विसरत चाललोय. एकदा तरी जावुन बघा त्या वृद्धाश्रमात कोनत्या परीस्थीतीत जिवन जगत आहे ती आज तिथे. रोज वाटत असतात तिला आज नक्की येनार माझा मुलगा मला न्यायला,पन वाट बगु-बगु एका मागे एक दिवस सरतात पन तिची मुलाला भेटायची इच्चा पुर्ण होत नाही कारन तिने जन्म दिलेला मुलगा आज तिला ओळकत नाही.

" वा ये दुनीया,जो सिर्फ पैसो के लिये जिती है "
आणी असच तिच पुर्ण आयुष्य त्या वृद्धाश्रमात निघुन जात. मुलांनो नका असं करूहो,खुप छान आहे रे ती,जन्म दिलाय रे तीने आपल्याला.नका खाऊ घालु तिला रोज पुरन पोळी. तिला आज पन तिच्या सुनेच्या हातची चटनी भाकरच गोड लागते,फक्त तिच्या शेवटच्या श्वासापर्यत तुमच्या नजरेसमोर राहु द्या..बस यापेश्रा दुसर सुख नकोय तिला तुमच्याकडुन...

लियायच तर खुप काही होत आई, पन आजच्या परीस्थीतीच वर्णन केल्यास लिहायला सुरूवात केल्याबरोबर रड येतो, कारन मी नाही पाहु शकत तुला त्या वृद्धाश्रमात आई. आई मी नाही जावु देनार तुला तीथे, सगळ्या मुलांनी हाच विचार करा,आपल्याला पण मुलबाळ होनार, आपन पण म्हातार होनार, आपल्या वर पन ही परीस्थीती ऊद्भवु शकते.म्हनुन आई-बाबाला त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यत आपल्या जवळ ठेवा.
१) ज्याला हात नाही,त्याला विचार हाताची किंमत
२) ज्याला पाय नाही,त्याला विचार पायाची किंमत
३) आणि ज्याला माय नाही,त्याला विचार त्या मायेची किंमत
४) ढसाढसा रडतात ती मुले जी अनाथ आहे. 
आणिआपल्यापाशी सगळ काही असुन आपन त्यांना दुर करण्याचा प्रयत्न करतो. जमेल तर नक्की वागवा मिञांनो,सगळ काही सुख हे माय बापाच्या चरनी असतात.                                    ......सोमनाथ राऊत

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी