नविन नांदेड (एनएनएल) श्रावणमासानिमित्त वसरणी ते श्री औंढा नागनाथ पर्यंत निघालेल्या पदयात्रेचे उत्साहात स्वागत शिवसेनेचे संजय जोंधळे यांनी वसरणी येथे स्वागत केले व सहभागी भक्तांना फळे वाटप करण्यात आले.
वसरणी येथून औंढा नागनाथ पदयात्रेचे आयोजन भालचंद्र मोळके यांच्या वतीने करण्यात आले होते. या
पदयात्रेत जवळपास 100 जनांचा सहभाग होता. सदरील पदयात्रा वसरणी येथील मारोती मंदिरापासून सुरुवात करण्यात आली यावेळी भाविक भक्तांचा सत्कार शिवसेनेचे संजय जोंधळे यांनी केला. व भाविकांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी वसरणी येथील पोलीस पाटील रावसाहेब गजभारे, सुहास खराणे, सुदर्शन गजभारे, विलास काळे, राहूल वाघमारे, बालाजी गजभारे, गौतम पवळे, विक्की गुंजावळे, शुभम गजभारे यांनी केले तर कौठा येथे सदरील पदयात्रेच्या सहभागी भाविकांना जि.प.सदस्य गंगाप्रसाद काकडे, राजु काळे, नगरसेवक संजय मोरे यांनी अल्पोपहाराचे वाटप केले.
नांवामनपा कर्मचा-यांच्या वतीने श्रीक्षेत्र काळेश्वर, विष्णुपुरी येथे महाप्रसादाचे आयोजन
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी व क्षेत्रिय कार्यालय अ,ब,क,ड च्या वतीने श्रावणमास निमित्त श्रीक्षेत्र काळेश्वर, विष्णुपुरी येथे महाप्रसादाचे आयोजन आज दि.09 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 04 दरम्यान करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावणमास निमित्त श्रीक्षेत्र काळेश्वर, विष्णुपुरी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आयुक्त गणेश देशमुख, महापौर शैलजा स्वामी यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कर्मचा-यांची उपस्थिती राहणार असून या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे महाप्रसादाचा घेतला अनेकांनी लाभ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे श्रावणमासानिमित्त व पाऊस पडावा यासाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा येथे श्रावण महिन्यानिमित्त व पाऊस पडावा यासाठी संजय जोंधळे, रघु गज्जेवार, रुक्माजी लामदाडे, शंकर धडके, गोविंद वट्टमवार, शिवाजी जाधव, पांडुरंग पदमवार, राजु नांदेडकर, निलेश मछरलावार, विश्वांभर भायेगांवकर, प्रल्हाद मुपडे, काळबा मस्के, रामदास चिंतले, सुनिल शिंदे, गणपत पाटील, संदिप महाजन, संतोष तुप्तेवार, गोविंदराव टाकळगांवकर, विजय लामदाडे, सुनिल गोपवाड, रंगनाथ देशमुख, डिगंबर काळे, डिगांबर कात्रजकर, मनोहर हत्ते, राहूल कांबळे यांनी या महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.