पूजा गायकवाड यांच्या कवितांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

नांदेड (एनएनएल) युवा सेनेच्या वतीने कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कवि संमेलनात सौ. पूजा निवृत्ती गायकवाड यांनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.


युवा सेनेच्या वतीने आयोजित या कवि संमेलनात
पूजा गायकवाड़ (डकरे)  यांनी ‘क्षण क्षण आयुष्य’ ही मराठी तर ‘शहीदों की जिंदगी ’ ही हिंदी कविता सादर केली. मराठी कवितेने श्रोते भाऊक तर शहीदों की जिंदगी या कवितेने श्रोत्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत केली. ही कविता सादर होताना संपूर्ण प्रेक्षागृह स्तब्ध झाले होते. याच कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या प्रणीता देवरे यांच्या हस्ते पूजा गायकवाड लिखित ‘प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमानंतर कवियत्री पूजा गायकवाड यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी