जिल्हाधिकारी व आ.प्रदिप नाईक यांच्या चर्चेत शेतकरी हिताचा निर्णय !

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 
बंधाऱ्याचे दारे ऐन पावसाळ्यात बंद करण्याची वेळ ! 

माहुर (सरफराज दोसाणी) माहुर तालुक्यात अत्यअल्प झालेल्या पावसा मुळे पिके कोरपु लागली असुन पावसाळ्यात हि पेयजल समस्या अनेक गावात उद्भवली आहे.संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आ.प्रदिप नाईक यांनी जिल्हाधिकारी अरुन डोंगरे यांच्या सोबत चर्चा करून तातडीने दिगडी बंधाऱ्याचे दार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहुर/किनवट तालुक्यातील नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या दिगडी,मोहपुर,साकुर च्या बंधार्याची दारे शासन निर्णया नुसार पावसाळा लागताच काढण्यात आली होती.मात्र सध्या तालुक्यात सरासरी पेक्षा केवळ 30 टक्के पाऊस पडल्याने नादी, नाले, तलाव,
कोरडे पडले असुन, जमिनीतली पाणी पातळी हि घटल्याने समोर तिव्र पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता पाहता आमदार प्रदिप नाईक यांनी काल दिनांक 07(सोमवार) रोजी नांदेड जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या लक्षात तालुक्याची दुष्काळा जण्य परीस्थीती लक्षात आणुन दिली व संभाव्य पाणी टंचाई वर मात करण्यासाठी प्रथम दिगडी बंधाऱ्याचे दार बंद करून दिगडी चा बंधार्यात पाणी साठवुन नंतर साकुर व त्यानंतर मोठी लांबी असलेल्या मोहपुर बंधाऱ्याचे दार बंद करावे लागेल या बाबत चर्चा केली.त्याला जिल्हाधिकार्याने सहमती दर्शविल्या ने उप अभियंता गावंडे यांना या बाबत अवगत करण्यात आले.बंधार्यांचे दार बंद करण्याचे काम विनाविलंब चालु करण्याचे आ.प्रदिप नाईक यांनी संबंधितांना सुचना दिल्या.या निर्णयामुळे शेतकऱ्यांत व नागरीकात समाधान पसरले आहे.

माहुर शहरात हि पेयजल समस्या 
पावसाळा सुरु होऊन दोन महिण्यांचा कालावधी उलटला असुन आज पर्यंत केवळ 260 मिली मिटर पाण्याची नोंद असुन हि सरासरी केवळ तिस टक्के आहे.परीनामी माहुर शहर वाशीयांची जिवन वाहिनी असलेली पैनगंगा नदी कोरडी ठात पडली आहे.नदीतील पाणी साठा अत्यंत कमी राहिल्याने नगरपंचायत माहुर चे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांना हि आमदार प्रदिप नाईक यांनी नदी वरील बंधाऱ्याचे काढलेले गेट पुन्हा बसवा अशा सुचना केल्या आहेत.एकदंरीत अत्यअल्प पावसा मुळे पेयजल समस्या उद्भवणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी