वीज कोसळल्याने सिरंजनी येथील शेतकऱ्याच्या शेतातील घराला आग

३ लाख ६० हजारांचे नुकसान 
शेतकरी कुटुंब व जनावरे बालंबाल बचावले 

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातही मौजे सिरंजनी येथील शेतात वास्तव्यास राहणाऱ्या घरावर दि.०७ च्या मध्यरात्रीच्या सुटलेल्या वादळी वाऱ्यात वीज कोसळून अखे घर खाक होऊन साढेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. दैव बालवत्तर म्हणून घरातील कुटुंब व आखाड्यावरील जनावरे बालंबाल बचावले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे
सिरंजनी गावातील शेतकरी श्री परमेश्वर तुकाराम शिल्लेवाड घराची परिस्थिती हळदीची असल्याने आपल्या कुटुंबासह शेत सर्व नंबर मध्ये वास्तव्यात राहतात. नेहमीप्रमाणे सोमवारी दिवसभर शेतातील कामे करून आपली जनावरे बांधून पती - पत्नी मुलगा झोपले होते. दरम्यान मध्यरात्रीला आभाळात दाटून आलेल्या ढगांबरोबर वादळी वारे व पावसाळा सुरुवात झाली. तसेच विजांचा कडकडाट होऊन राहत्या एखाद्याच्या घरावर वीज कोसळली, दरम्यान वैराण आगीने जळत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांना घरच्यांना उठउन घराबाहेर काढले तर मुलाने बांधलेली जनावरे सोडून दिली. तसेच आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले, पाणी उपलब्ध नसल्याने तसेच गावापासून शेत - घर दूर असल्याने कोणाचीच मदत मिळाली नाही. परिणामी आखाड्यासह घर जाळून खाक झाले.  या घटनेत शेतकऱ्याचे शेती अवजारे, गृहउपयोगी साहित्य, कपडे - लत्ते, नागडी रक्कम यासह टिन - पत्रे आगीच्या भक्षस्थानी संपादून ३ लक्ष ६० हजाराचे नुकसान झाले आहे. दैव बालवत्तराने कोणतीही जीवित हानि झाली नसली तरी, घरच्या बाजूला असलेले सोयाबीन व कापसाचे पीकही आगीच्या लोटामुळे जळाले. त्यामुळे शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. घटनेची माहिती मिळताच येथील युवा कार्यकर्ते पवन करेवाड यांनी या सज्जाचे तलाठी तावडे व ग्रामसेवक खिल्लारे, पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळावर भेट देऊन सकाळी वीज कोसळून घर जळून नुकसान झाल्याचा पंचनामा केला. या घटनेतून सावरण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास तातडीची मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यातून केली जात आहे.  

गेल्या महिन्याभरापासून वरून राजाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे यंदाची पीकपरिस्थिती चांगली होऊन सुगीचे दिवस येतील कि नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. यातच सिरंजनीच्या शेतकऱ्याच्या घराला आग लागली या आगीचे लॉट घराच्या बाजूला असलेल्या शेतीतील सोयाबीन, कापसाच्या पिकाला लागल्याने जमीन पीकही नुकसानाची आले असून, निसर्गाच्या लहरीपणाचा जबरदस्त फटका या शेतकऱ्यास बसला आहे. शासन शेतकऱ्यास तातडीची मदत देते कि मागल्या घटनेप्रमाणे ताटकळत ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी