भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहीनीचा अपघातात मृत्यू



नायगाव बाजार (प्रभाकर लखपत्रेवार) मोटारसायकल ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती व दोन चिमुकले बालंबाल बचावल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता. नांदेड नरसी महामार्गावर नायगाव बसस्थानकावर घडली. अपघातानंतर चालक ट्रकसह पळून जात असताना रामतीर्थ पोलिसांनी नरसीजवळ पकडले. मयत महीला भावाला राखी बांधण्यासाठी आंध्रप्रदेशातील
जुक्कल येथे असतांना हा दुदैवी अपघात घडला.

याविषयी अधिक माहिती अशी की, जिंदम नगर, गोपाळ चावडी सिडको येथील दिलीप मारोती धमने हे पत्नी व दोन चिमुकल्यासह एम.एच. एस ७६९२  या मोटरसायकलवर आंध्रप्रदेशातील जुक्कल येथे जात असताना नांदेड नरसी महामार्गावर नायगाव येथील बसस्थानकावर  दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पाठीमागून एच.आर.५५, पी ९४८५ या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिल्याने सौ. सपना दिलीप धमने (२८) ह्या जागीच ठार झाल्या तर पती दिलीप धमने व दोन चिमुकले बालंबाल बचावले. अपघातानंतर ट्रकचालक पळून जात असताना रामतीर्थ पोलिसांनी नरसीजवळ पकडला आहे. अपघातात सौ. सपना यांचा मेंदू पुर्णतः रस्त्यावर पडला होता. भर दुपारी बसस्थानकावरच हा भिषण अपघात घडल्याने प्रचंड गर्दी जमली होती. 

विशेष म्हणजे सौ. सपनाला घेवून पती दिलीप धमने हे राखी बांधण्यासाठी जात असताना हा दुदैवी अपघात घडला पण या अपघाताने दोन चिमुकल्यांना आईच्या मायेपासून पोरके व्हावे लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मयताची उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत सौ. सपना धमने ह्या सिडको येथील पत्रकार अनिल धमने यांच्या भावजय होत्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी